31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक जेलरोड येथे धावत्या रिक्षाने घेतला पेट;चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली जीवितहानी

नाशिक जेलरोड येथे धावत्या रिक्षाने घेतला पेट;चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली जीवितहानी

अझहर शेख-मनोज मालपाणी, नाशिकरोड: जेलरोडवरून बिटकोच्या दिशेने रविवारी (दि.७) सकाळी जाणाऱ्या प्रवासी रिक्षाने (एमएच१५ जेए २३७७) सानेगुरूजीनगरजवळ अचानकपणे पेट घेतला.(Auto-rickshaw catches fire ) सुदैवाने रिक्षामध्ये कोणी प्रवासी नव्हते, तसेच चालकानेसुद्धा प्रसंगावधान दाखविले. यामुळे जीवीतहानी टळली. मात्र आगीत संपूर्ण रिक्षा भस्मसात झाली. जेलरोड मगर चाळ इथे राहणारे रिक्षाचालक मोहम्मद सुफरान पठाण (५८) हे रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जेलरोडकडून बिटकोच्या दिशेने जात होते. साने गुरुजी नगर महाजन हॉस्पिटल समोरून रिक्षा जात असताना अचानक रिक्षातून काहीतरी जळण्याची दुर्गंधी त्यांना जाणवली. तसेच धुर येऊ लागल्याचेही लक्षात आल्याने पठाण यांनी रस्त्यालगत रिक्षा उभी केली अन् खाली उतरले.(Auto-rickshaw catches fire at Nashik Jail Road; Loss of life averted due to driver's intervention )

क्षणार्धात रिक्षाच्या खालीचल बाजूने आगीने पेट घेतला. काही मिनिटांतच संपुर्ण रिक्षा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यावेळी जेलरोड वरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांची तारांबळ उडाली होती. घटनेची माहिती अग्नीशमन दलाला कळविण्यात आली. नाशिकरोड उपकेंद्राचा बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण रिक्षा आगीत जळून राख झाली होती. यामध्ये
सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी रिक्षा मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी आग विझावण्याचा प्रयत्न केला.मात्र आग मोठया प्रमाणात वाढली. काही नागरिकांनी अग्निशमक दलाला कळवले, दलाचे जवान एल पी बेंद्रेबेंद्रे, एस एम जाधव, आर आर काळे, पी डी पुरी, राजाभाऊ गोसावी व मंगेश जाधव यांनी एक बंबच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगीत रिक्षा पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने रिक्षामध्ये प्रवासी नव्हते, नाहीतर मोठी अघटित घटना आज घडली असती. नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बर्निंग रिक्षाचा थरार अनुभव अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. जेलरोडच्या दोन्ही मार्गांवर नागरिकांनी गर्दी केली होती.

काही नागरिकांनी अग्निशमक दलाला कळवले, दलाचे जवान एल पी बेंद्रेबेंद्रे, एस एम जाधव, आर आर काळे, पी डी पुरी, राजाभाऊ गोसावी व मंगेश जाधव यांनी एक बंबच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगीत रिक्षा पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने रिक्षामध्ये प्रवासी नव्हते, नाहीतर मोठी अघटित घटना आज घडली असती. नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बर्निंग रिक्षाचा थरार अनुभव अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. जेलरोडच्या दोन्ही मार्गांवर नागरिकांनी गर्दी केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी