31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रOMG : अबबss गायीच्या पोटातून निघाले ७० किलो प्लॅस्टिक, साडी, ब्लाउज, वायरचे...

OMG : अबबss गायीच्या पोटातून निघाले ७० किलो प्लॅस्टिक, साडी, ब्लाउज, वायरचे तुकडे, दोरखंड आणि प्लॅस्टिक चेंडू!

टीम लय भारी

सातारा : शिंगणापूर येथे गायीच्या पोटातून तब्बल ७० किलो प्लॅस्टिकचा कचरा (Plastic waste) काढण्यात आला आहे. डॉ. प्रदीप पोळ (Dr Pradip Pol) यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.

शिखर शिंगणापूर ता. माण येथील एका गायीचे पोट फुगून पचनक्रियेस त्रा होत होता. खिलार जातीच्या या गायीवर गोंदवले बुद्रुक येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप पोळ यांनी अडीच तास किचकट शस्त्रक्रिया करून गाईस जीवदान देत गायीच्या पोटातून ७० किलो प्लॅस्टिक कचरा काढला.

शिखर शिंगणापूर येथील सचिन बडवे यांनी खिलार जातीची देशी गाय पाळली आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून गायचे पोट फुगले होते. तसेच गायीची रवंथ प्रक्रिया थांबल्याने खाल्लेला चारा पचन होतानाही त्रास होत होता. गायीच्या पोटात वासरू असल्याने तिची प्रकृती अधिकच खालावली होती. याबाबत सचिन बडवे यांनी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी मदने यांचा सल्ला घेतला. तसेच गोंदवले येथील डॉ. प्रदीप पोळ यांनीही गायीच्या पोटात अविघटीत कचरा असून गायीसह वासराचा जीव वाचविण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर डॉ. प्रदीप पोळ, डॉ. मदने, डॉ. बाबुराव गेंड, डॉ. शंभूराज शेडगे, डॉ. सागर खाडे, डॉ. शिवाजी शेळके यांच्या पशुवैद्यकीय पथकाने तब्बल अडीच तास शस्त्रक्रिया करून गाईच्या पोटातून विघटन न झालेला कचरा बाहेर काढला. यावेळी प्लॅस्टिक कागद, साडी, ब्लाउज पीस, रबरी वस्तू, वायरचे तुकडे, दोरखंड, प्लॅस्टिक चेंडू यासारख्या अपचनीय वस्तूंचा तब्बल सुमारे ७० किलोहून अधिक कच-याचा राडा गायीच्या पोटातून काढण्यात आला. डॉ. पोळ यांनी जवळपास अडीच तासांची अतिशय किचकट शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून गाय आणि वासरास जीवदान दिले.

या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी अजित बडवे, महेश बडवे, विनायक बडवे, प्रभंजन बडवे, अमित बडवे, शिव जंगम, संतोष बडवे यांनी मोलाची मदत केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी