29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeटॉप न्यूजBJP MP MLA : सोशल डिस्टन्शिंगची ऐशीतैसी, भाजप खासदार – आमदाराने शेकडो...

BJP MP MLA : सोशल डिस्टन्शिंगची ऐशीतैसी, भाजप खासदार – आमदाराने शेकडो लोकांना जमा करून मदत वाटपाचा सोहळा केला

टीम लय भारी

सातारा : घराबाहेर पडू नका, जाहीर कार्यक्रम घेऊ नका, एकत्र येऊ नका असे केंद्र व राज्य सरकारने बजावले आहे. पण याची कसलीही तमा माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर व माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे ( BJP MP MLA ) यांना नसल्याचे समोर आले आहे.

या खासदार – आमदार दुकलीने ( BJP MP MLA ) चक्क जंगी सोहळा आयोजित करून लोकांना मदत वाटप केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

BJP MP MLA
मदत वाटप करताना सोशल डिस्टन्शिंगची ऐशीतैसी केल्याचे दिसत आहे

भले मोठे बॅनर लावून भाजपच्या या खासदार – आमदार जोडगोळीने ( BJP MP MLA ) जंगी सोहळा साजरा केला. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे, गोरगरीब, अंपग यांना मदत वाटप करतानाचे फोटो सेशनसुद्धा घडवून आणले आहे. व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

BJP MP MLA
मदतीसाठी गरजू लोकांना असे ताटकळत उभे ठेवले होते. त्यात सोशल डिस्टन्शिंगचेही पालन झाले नाही

माण – खटाव मतदारसंघात चार ‘कोरोना’ रूग्ण ( BJP MP MLA ) सापडले आहेत. सातारा जिल्हा रेड झोनमध्ये आहे. माण – खटावमधील लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. संचारबंदी लागू आहे. कोणताही जाहीर कार्यक्रम घेण्यास राज्यभरात बंदी आहे. असे असताना निंबाळकर – गोरे ( BJP MP MLA ) दुकलीने सगळे कायदे – नियम धाब्यावर बसविले आहेत.

BJP MP MLA
बिचाऱ्या अपंग व्यक्तीला सुद्धा मदत देताना खासदार – आमदारांनी प्रसिद्धीचे प्रदर्शन केले

धक्कादायक म्हणजे, सोशल डिस्टन्शिंगची ऐशीतैशी करीत आमदार गोरे यांनी लोकांसोबत पोहण्याचा आनंद लुटला होता. हा प्रकार ‘लय भारी’ने नुकताच चव्हाट्यावर आणला होता. त्यामुळे गोरे यांच्यावर टीका सुरू आहे. अशातच गोरे यांनी मदत वाटपाचे हिडीस प्रदर्शन केल्याचा नवा प्रकार पुढे आला आहे.

हे सुद्धा वाचा : BJP MLA : भाजपचा आमदार लोकांसोबत पोहण्यात दंग, सोशल डिस्टन्शिंगच्या तिनतेरा

पोलीस, तहसिलदार, प्रांतांच्या नाकावर टिच्चून जाहीर सोहळा

दहिवडी येथील फलटण चौकात मदत वाटपाचा जाहीर सोहळा खासदार – आमदार दुकलीने ( BJP MP MLA ) आयोजित केला होता. या ठिकाणाहून पोलीस ठाणे, तहसिल कार्यालय व प्रांत कार्यालय अगदीच जवळ आहे. असे असतानाही या तिन्ही अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित झाला आहे.

BJP MP MLA
लोकांना मदत वाटप करताना कसलेही सोशल डिस्टन्शिंग पाळले नाही

राजकीयदृष्ट्या मातब्बर आहेत म्हणून अधिकारी वर्ग खासदार – आमदार ( BJP MP MLA ) दुकलीच्या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करीत आहेत की काय असाही सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.

BJP MP MLA
गरजवंतांना मदत देताना अशा वाईट पद्धतीने बसवून सोहळा साजरा केला

विरोधकांकडून आदर्श घ्यायला हवा

माजी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख हे जयकुमार गोरे यांचे राजकीय विरोधक आहेत. देशमुख यांनीही लोकांना मदत वाटप केले. पण त्यांनी हिडीस प्रदर्शन केले नाही. लॉकडाऊनमुळे ते पुण्यात अडकले आहेत. आपल्या अधिकारपदाचा दुरूपयोग करून देशमुख फोटो सेशनसाठी मतदारसंघात गेले नाहीत.

त्यांनी गहू, तांदुळ, साबण, तेल अशा जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करून तालुक्यात पाठविली. वेगवेगळ्या टीम तयार केल्या. गावागावांत गोरगरीब लोकांच्या घरी कार्यकर्त्यांकरवी मदत पोहोचवली. मदत करताना त्यांनी स्वतःचे बॅनर कुठेही लावले नाहीत. त्याचा गाजावाजा सुद्धा केला नाही.

Rane Vs Pawar

त्यामुळे निंबाळकर – गोरे ( BJP MP MLA ) दुकलीने विरोधक असलेल्या प्रभाकर देशमुख यांचा आदर्श घ्यावा अशी भावना लोकांमधून व्यक्त केली जात आहे.

याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तहसिलदार बी. एस. माने, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी फोन उचलला नाही, तर प्रांताधिकारी आश्विनी जिरंगे यांचा मोबाईल स्विच्ड ऑफ येत होता.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

भाजप आमदाराच्या बेफिकीरीचा हा व्हीडीओ सुद्धा पाहा

हे सुद्धा वाचा

Scholarship : धनंजय मुंडेंनी ‘तो’ निर्णय घेतला मागे!

Coronaeffect : हिंदू समजून मुस्लिम मृतदेहावर केले अंत्यसंस्कार!

BJP’sHypocrisy : भाजपचा आणखी एक खोटारडेपणा : जुना व्हिडिओ प्रसारीत करुन ठाकरे सरकारची बदनामी

Coronavirus : मुंबईवरून शिरूरमध्ये आलेल्या एकाच घरातील तिघांना ‘कोरोना’

केंद्र स्थलांतरीत मजुरांचे 85% रेल्वे भाडे देते याचा पुरावा द्या अन्यथा जनतेची माफी मागा; चंद्रकांत पाटील यांना काँग्रेसचे आव्हान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी