30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रRaosaheb Danve : 'रावसाहेब दानवेंची जीभ कापणा-याला देणार गाडी आणि 10 लाखांचे...

Raosaheb Danve : ‘रावसाहेब दानवेंची जीभ कापणा-याला देणार गाडी आणि 10 लाखांचे रोख बक्षीस’

टीम लय भारी

यवतमाळ : शेतक-यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणा-या रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची जीभ जो कोणी कापेल, त्याला आपण लगेच 12 लाखांचे वाहन भेट देऊ, त्या क्षणापासुन आपण पायी फिरू, वाहन वापरणार नाही, एवढेच नाही तर त्याला आणखी दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. शिवाय त्याची रक्ततुलाही केली जाईल, अशी घोषणा शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख संतोष ढवळे यांनी केली आहे.

दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनामागे चीन-पाकिस्तानचा हात असल्याचे बेताल वक्तव्य करणारे भाजपचे नेते आणि केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची जीभ कापणा-या व्यक्तीला दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊ, अशी घोषणा यवतमाळमधील शिवसेनेच्या (Shivsena) आंदोलनात विधानसभा मतदारसंघ प्रमुख संतोष ढवळे (Santosh Dhavale) यांनी केली. पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज (शनिवार) दत्त चौकात शिवसैनिक एकत्र आले, यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली.

संतोष ढवळे यांच्या घोषणेचे उपस्थितांनी जोरदार स्वागत केले. दानवेंची जीभ कापण्यासाठी आपण केवळ कुणावर अवलंबून राहणार नसून स्वत:ही योग्य संधीची प्रतीक्षा करु आणि हे काम फत्ते करु, असेही ढवळे यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी