31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रसचिन वाझेंची प्रकृती पुन्हा खालावली

सचिन वाझेंची प्रकृती पुन्हा खालावली

टीम लय भारी

मुंबई :- मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात मुंबई पोलीस दलातील वाद्रगस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना आज एनआयएने अटक केली आहे. वाझेंना १० दिवसांची एनआयए (NIA) कोठडी मिळाल्यानंतर त्यांचे आज पोलीस दलामधून निलंबन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत असलेले सचिन वाझे यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे.

सचिन वाझे यांना आता उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. काल रात्री ही त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे एनआयएच्या कार्यालयात मध्यरात्री डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते. साधारण एक वाजण्याच्या सुमारास हे डॉक्टर एनआयएच्या कार्यालयातून बाहेर पडले.

आज दुपारी पुन्हा वाझे यांची प्रकृती खालावल्याचे समजते. एनआयएच्या कार्यालयात उपचार करणे शक्य नसल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात नेण्यात आल्याचे समजते. यापूर्वी शनिवारी रात्रीही सचिन वाझे यांची प्रकृती खालावली होती. एनआयएने त्यांची सलग १३ तास चौकशी केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांना थकवा जाणवायला लागला होता. त्यामुळे सचिन वाझे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात गेले होते. या ठिकाणी त्यांना सलाईन लावण्यात आले होते, अशी माहितीही सूत्रांनी दिली होती. त्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी सचिन वाझे यांच्यावर डॉक्टर बोलावून उपचार करण्याची वेळ आली आहे. सचिन वाझे यांच्या चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून एनआयए कडून त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी