27 C
Mumbai
Thursday, June 13, 2024
Homeमहाराष्ट्र'हा' अभिनेता देणार १ लाख बेरोजगारांना रोजगारांच्या संधी

‘हा’ अभिनेता देणार १ लाख बेरोजगारांना रोजगारांच्या संधी

टीम लय भारी

मुंबई :- संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. तेव्हा देवाच्या रूपांत सोनू सूद हा लोकांच्या मदतीसाठी धावून आला आणि गरीब आणि परप्रांती मजुरांसाठी मदतीचा हात पुढे केला. तुम्ही बेरोजगार आहात, नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता सोनू सूद हा बेरोजागार लोकांसाठी सुवर्ण संधी घेऊन आला आहे. टि्वटरवरून त्यानी माहिती दिली आहे.

त्याने केलेल्या ट्विटमध्ये असे लिहिलंय आहे  की, त्यांनी सुमारे १० कोटी लोकांचे आयुष्य बदलण्याची योजना आहे. यासाठी तो एक लाख लोकांच्या नोकरीची व्यवस्था करणार आहे. हे काम अर्थात टप्प्प्याटप्प्याने केले जाणार आहे. पुढील पाच वर्षांच्या आत सुमारे १० कोटी लोकांचे आयुष्य बदलण्याच्या योजनेवर काम करत असल्याचे सोनू सूदने जाहीर केले आहे.

यासाठी त्याने एक अॅप तयार केला आहे. या अॅपची माहिती देत तो डाऊनलोड करण्याचे आवाहन त्याने केले आहे. त्यांने टि्वटमध्ये लिहिले आहे की, – नया साल, नई उम्मीदें
नई नौकरी के अवसर…
और उन अवसरों को आपके करीब लाते, नए हम।
प्रवासी रोजगार अब है गुडवर्कर।
आज ही गुडवर्कर एप्लिकेशन को डाउनलोड करें और बेहतर कल की उम्मीद करें

लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद गरीबांचा मसीहा म्हणून ओळखला जाऊ लागला. हजारो गरीब मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सोनुनं मदत केली होती.

 

लोकांनी सोनूच्या या आवाहनलाना भरभरून प्रतिसाद दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी