महाराष्ट्र

शिवरायांचे राज्य कुटुंबाच्या नावाने नव्हते; रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य होते : शरद पवार

छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) आठवण आपल्याला होते तेव्हा या देशात सत्ता हातात आल्यानंतर ती सामान्यांसाठी वापरायची असते. याचा आदर्श शिवछत्रपतींनी निर्माण केला याचे स्मरण होते. या देशात राजे-रजवाडे अनेक होऊन गेले पण आपण कधी मोघलांचे नाव ऐकले, कधी जयपूरचे नाव ऐकले तर कधी अन्य राज्यांचे नाव ऐकले. पण या सगळ्या राजांची राज्ये त्यांच्या नावाने केली होती. एकच राज्य होते जे कुटुंबाच्या नावाने नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केले पण ते भोसल्यांचे राज्य नसून रयतेचे राज्य होते, ते हिंदवी स्वराज्य होते. हा इतिहास छत्रपती घराण्याने आजपर्यंत जतन केला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. (Sharad Pawar said, Shivaji Maharaj’s kingdom was not in the family name) श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. यावेळी श्री शाहू छत्रपती महाराज यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, या देशातील प्रत्येक माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आनंद आहे, अभिमान आहे. तशाच प्रकारची समतेची विचारधारा कृतीमध्ये आणणारे राजे कोणते याची चर्चा कुठेही झाली तर एक नाव निघते ते म्हणजे श्री शाहू छत्रपती महाराज. ही परंपरा त्यांनी सातत्याने जपली.  त्यांचे लक्ष हे शेवटच्या माणसाकडे होते. महाराष्ट्रात कधी भूकंप, महापूर, कोरोनाचे संकट आले अशा प्रत्येक वेळी छत्रपती राजवाड्यात राहीले नाहीत तर ते सामान्य माणसाचे दुखणे दूर करण्यासाठी रस्त्यावर आले. म्हणून अशा राजाचा आज सत्कार होतोय याचा आनंद आपल्या सर्वांना आहे.

हे सुद्धा वाचा

मुसळधार पावसात बाबा स्वत: कंदील घेऊन संयोगिताराजेंना शोधत आले; शाहू छत्रपती महाराजांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त संभाजीराजेंचे भावनिक पत्र

हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखे; संजय राऊतांची टीका

मंत्रिमंडळ विस्तार होत नसेल तर स्पष्ट सांगा: आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून मनस्वी समाधान लाभले. आजचा सोहळा आपल्या सर्वांना आनंद देणारा आहे. छत्रपती शाहू महाराजांना पंचाहत्तर वर्ष झाली. या काळात अनेक गोष्टी त्यांना उभ्या केल्या. त्यांना कुस्तीच्या क्षेत्रात, खेळाच्या क्षेत्रात आस्था आहे, शैक्षणिक क्षेत्रात आस्था आहे. यासंबंधी अनेक संस्था उभारून उत्तम प्रकारे चालवण्याची भूमिका त्यांनी घेतली.छत्रपतींचा इतिहास जनमानसाच्या अंत:करणात त्यांनी दृढ केला. अशा राजाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांना अंत:करणापासून शुभेच्छा देतो, त्यांना उत्तम आरोग्य लाभावे अशी प्रार्थना करतो आणि त्यांचे मार्गदर्शन संपूर्ण महाराष्ट्राला अखंड मिळेल अशी अपेक्षा करतो, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

 

प्रदीप माळी

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

13 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

13 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

13 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

13 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

16 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

16 hours ago