28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयहे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखे; संजय राऊतांची टीका

हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखे; संजय राऊतांची टीका

अधिवेशनाच्याकाळात मी सरकारचा कारभार जवळून पाहिला. त्यावरुन हे सरकार अस्तित्त्वातच नाही असे वाटते. रोज मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असताना सरकार गप्प आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूखंड भ्रष्टाचाराची दोन प्रकरणे, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भूखंडाच्या भ्रष्टाचाराची दोन प्रकरणे, उदय सामंत यांचे प्रकरण अधिवेशनाच्या काळात बाहेर येवून सुद्धा सरकार (Shinde-Fadnavis government) पाण्यात बसलेल्या म्हशीप्रमाणे होते, अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. ते सध्या दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांशी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. (Sanjay Raut Criticism Shinde-Fadnavis government is like a buffalo sitting in water)

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, पूर्वी राज्यात एखादा मंत्री, उपमुख्यंत्री यांच्यावर हायकोर्टाने ताशेरे मारले तरी ते राजीनामे देत असत, मात्र आता अधिवशनात मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे पूराव्यासह बाहेर येऊनसुद्धा सरकार ठोंब्यासारखं बसून आहे, असे सांगतानाच या सरकारमध्ये दोन गट पडले असून त्यांचे सरकार चाळीस आमदारांच्या पलीकडे नाही, असे देखील राऊत यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा 

दांडीबहाद्दर ग्रामसेवकांना एकनाथ शिंदेंचा झटका! ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची हजेरी होणार बायोमेट्रिक प्रणालीद्वारे

चित्रा वाघ खुलासा करा, अन्यथा एकतर्फी कारवाई; राज्य महिला आयोगाची नोटीस

खात्रीने सांगतो महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार येणार; केंद्रात ही सत्ता आणू : नाना पटोले

यावेळी संजय राऊत म्हणाले, कायद्यानुसार १६ आमदार अपात्र ठरतील देशात कायदा, संविधान आणि घटना आहे. त्याचा व्यवस्थित वापर झाल्यास हे सरकार फेब्रुवारी महिना देखील पाहणार नाही. राज्यातील राजकीय वातावरण परिवर्तनाच्या दिशेने चालले आहे. सध्या २०२४ ची तयारी सुरू असली तरी त्याआधी देखील परिवर्तन होऊ शकेल, असे संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेबाबत विचारले असता राऊत म्हणाले, शिवसेना भवनासमोर सभा घेण्यासाठी कोणाला बंदी नाही, प्रत्येकाचा आत्मा तिथे अडकला आहे. राज ठाकरे तेथे सभा घेणार असतील तर घेऊ द्या, सभा घेण्यास कोणाची बंदी आहे कां? आम्ही रोजच शिवतिर्थावर राज ठाकरेंच्या घरासमोर सभा घेतो. राज ठाकरे यांच्या सभेला पालिका परवानगी देणारच कारण सरकार त्यांच आहे. ते सगळ सुद्धा भाजपपुरस्कृत आहे. ज्यांची भीती सत्ताधाऱ्यांना नसते त्यांना कुठेही परवानगी मिळते, आम्हाला परवानगी मिळत नाही कारण सरकारला आमची भीती आहे, असा टोला देखील संजय राऊत यांनी यावेळी लगावला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी