आता कार्यालयातही बिनधास्त झोपा!

कामाच्या वेळेत डुलक्या कसल्या काढताय… मेमो हवाय का तुम्हाला… कार्यालयात एखादा कर्मचारी झोपा काढताना आढळला तर वरिष्ठांकडून अशा दरडावण्याच्या सुरात तंबी मिळायची. त्यामुळे निदान आपला बॉस असताना तरी झोपा काढण्याची कोणाची बिशाद होत नव्हती. पण काळानुसार कार्यसंस्कृतीदेखील (Work culture) बदलत जाते. याच बदलत्या कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीत कंपनीची (company) उत्पादकता वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांना चक्क झोपा (Nap) काढण्याची मुभा दिली जात आहे. यासाठी खास जागेची उभारणी करण्यात येत आहे. कित्येकदा कामाच्या अती ताणामुळे शारीरिक थकवा अथवा मरगळ आली असेल आणि तुम्हाला एक छोटी डुलकी काढायची असेल तर आता वरिष्ठांची भीती न बाळगता तुम्ही बिनधास्त झोप काढू शकता. “वेकफीट” (Wakefit), ‘नो ब्रोकर” (NoBroker), “लिशिअस” (Licious), “सॉल्व्ह अँड सिम्पली लर्न” (Solv and Simplilearn) यांसारख्या नवीन युगातील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना स्वतःसाठी थोडा निवांत वेळ मिळावा म्हणून ही हटके संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. (New corporate culture emerging now-you-can-sleep-in-your-office)

आजच्या धावपळीच्या युगात विशेषतः खासगी कार्यालयात काम कर्मचाऱ्यांचा दिनक्रम इतका व्यस्त होऊन गेला आहे की, त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळच मिळत नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची मानसशास्त्रीय गरज भागविण्यासाठी आणि त्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी “वेकफीट”, ‘नो ब्रोकर”, “सॉल्व्ह अँड सिम्पली लर्न” यांसारख्या नवीन युगातील कंपन्यांनी आपल्या कार्यालयांत वामकुक्षी कक्ष, विरंगुळा क्षेत्र उभारण्यास सुरुवात केली आहे.

आधीच्या नोकरदारांना हे ऐकून थोडे नवला वाटेल आणि या नवीन पिढीचा हेवाही वाटेल. पण अंतर्गत सजावट क्षेत्रात कार्यरत असलेल्या “वेकफीट” या कंपनीने “राईट तो नॅप” म्हणजेच डुलकी काढण्याचा अधिकार हा नवीन उपक्रम आपल्या कर्मचाऱयांसाठी सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत कर्मचाऱ्यांना कामावर असताना आठवड्यातून ठराविक तास विश्रांती घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

शिवरायांचे राज्य कुटुंबाच्या नावाने नव्हते; रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य होते : शरद पवार

मंत्रिमंडळ विस्तार होत नसेल तर स्पष्ट सांगा: आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

पाकिस्तानसमोर दहशतवादाचे आव्हान; सीमाभागातील हजारो लोक रस्त्यावर

“वेकफीट” कंपनीचे सहसंस्थापक चैतन्य रामलिंगेगौडा यांनी सांगितले की,”आमच्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक सुखसोयी मिळाव्यात यासाठी कंपनीचा धोरणात्मक भाग म्हणून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यासाठी कार्यालयात “नॅप रूम” तयार करण्यात आली असून याठिकाणी कर्मचारी वामकुक्षी घेऊ शकतात. या वेळेत ते चालण्याचा व्यायाम, योगाभ्यासदेखील करू शकतात जेणेकरून व्यस्त दिनक्रमातून काही वेळ त्यांना स्वतःसाठी देता येईल.

” नो ब्रोकर” आणि “लिशिअस” या कंपन्यांनीदेखील कर्मचाऱ्यांना अराम करण्यासाठी कार्यालयातील आवारात विशेष खोल्या उभारल्या आहेत. मासे आणि मांसची विक्री करणारी प्रसिद्ध कंपनी “लिशिअस” आपल्या कर्मचाऱ्यांना विरंगुळा घेण्यासाठी प्रोत्साहितही करत आहे. या वेळेत ते “पूल”, “डेस्क टेनिस”, “कॅरम” यांसारखे खेळही खेळू शकतात, असे मानव संसाधन प्रमुख नवीन कुमार यांनी सांगितले.

टीम लय भारी

Recent Posts

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

8 hours ago

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

8 hours ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

8 hours ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

8 hours ago

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

8 hours ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

9 hours ago