28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeराजकीयAjit Pawar : देवेंद्र फडणवीसांकडे लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार, अजित पवारांचा टोला

Ajit Pawar : देवेंद्र फडणवीसांकडे लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार, अजित पवारांचा टोला

तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद एकट्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाट्याला आले, त्यावर एकट्याने इतक्या जिल्ह्यांचा कारभार कसा पाहणार असे मिश्किलपणे अजित पवारांनी फडणवीसांना विचारले होते, त्यावर प्रत्युत्तर देत याचा गुरूमंत्र पवारांना देणार अशी टिप्पणी केली होती. या टिप्पणीवर अजित पवारांकडून सुद्धा उत्तर आलेले आहे.

राज्यात सत्तांतर होऊन नवे सरकार आले तरी आरोप – प्रत्यारोपांचे खेळ काही संपलेले दिसत नाहीत. या वादात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भर पडल्याचे दिसून येत आहे. एकमेकांना मिश्किल टोले लगावत सध्या समोरून येणाऱ्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे देत आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिंदे सरकारकडून राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद एकट्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाट्याला आले, त्यावर एकट्याने इतक्या जिल्ह्यांचा कारभार कसा पाहणार असे मिश्किलपणे अजित पवारांनी फडणवीसांना विचारले होते, त्यावर प्रत्युत्तर देत याचा गुरूमंत्र पवारांना देणार अशी टिप्पणी केली होती. या टिप्पणीवर अजित पवारांकडून सुद्धा उत्तर आलेले आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी इतर विषयांवर बोलत असताना देवेंद्र फडणवीसांच्या खोचक टिप्पणीला सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून विचारणार आहे की, मी तुमच्याकडे ट्रेनिंगला कधी येऊ, त्यासाठी किती फी लागेल? फडणवीस मला ही ट्रेनिंग मोफत देणार आहेत? त्यांच्याकडे जाऊन मी माझ्या ज्ञानात भर घालतो, असा मिश्किल टोला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना यावेळी लगावला. पवारांच्या या उत्तराने उपस्थित माध्यमे हसू थांबवू शकले नाहीत.

हे सुद्धा वाचा…

Adhani : आदानींच्या कंपनीला मिळाले मोठे काम

Organic Fertilizers : ‘या’ राज्यातील महिला बनवतात जैवीक खत

Viral News : धक्कादायक! ऑनलाईन साईटवरून मागवला ड्रोन, हाती पडले बटाटे

राज्यातील पालकमंत्रीपदाच्या वाटपानंतर एकत्र सहा जिल्हे एकटे देवेंद्र फडणवीस कसे सांभळणार असा प्रश्न करून अजित पवारांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न करत त्यांच्यावर टिका केली होती, त्यावर उत्तरादाखल देवेंद्र फडणवीस उत्तरले होते की, एकावेळी अनेक जिल्ह्यांचा कारभार कसा पाहायचा, याचा गुरुमंत्र मी अजित पवार यांना देईन असे म्हणून फडणवीसांनी विशेष टिप्पणी केली होती, मात्र त्यावर पुन्हा अजित पवारांनी उत्तर देत मी तुमच्याकडे ट्रेनिंगला कधी येऊ असे देवेंद्र फडणवीसांना विचारतो असे म्हणून त्यांनी सुद्धा त्यांचा किल्ला लढवला.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी पीएफआय संघटनेवरील कारवाई, शेतकऱ्यांचा देण्यात आलेली आर्थिक मदत, दसरा मेळावा अशा वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य करत मत व्यक्त केले. सध्या पीएफआयचा विषय तापत असताना पुण्यात या संघटनेकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे दिले की नाहीत, याचा तपास पोलीस अजून करत आहेत. याविषयी दररोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे, असे म्हणून पवार यांनी याबाबत स्पष्टता दिली.

सध्या राजकीय वर्तुळात एक वेगळाच मुद्दा गाजत आहे. अनेक नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर प्रश्न उपस्थित करण्यात येत असून 2014 मध्येच युतीच्या प्रस्तावासाठी काॅंग्रेसकडे शिवसेना आल्याचे अशोक चव्हाण यांनी सांंगितले, ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा सुद्धा सहभाग होता. या संपुर्ण घडामोडीवर माध्यमांनी अजित पवार यांना विचारले असता पवार म्हणाले, हे सगळे 2014 मध्ये घडले आहे, आता आपण 2022 मध्ये आहोत, थोड्याच दिवसांत 2023 सुरु होईल. त्यामुळे शिळ्या कढीला ऊत आणण्यात अर्थ नाही. जनतेला या सगळ्या वादांमध्ये रस नाही. बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरुन लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अशाप्रकारची वक्तव्यं केली जात आहेत असे म्हणून त्यांनी या विषयावर बोलणेच टाळले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी