31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रVarsha Gaikwad : दहावीची भूगोलाची परीक्षा रद्द, नववी व अकरावीचेही सगळे पेपर...

Varsha Gaikwad : दहावीची भूगोलाची परीक्षा रद्द, नववी व अकरावीचेही सगळे पेपर रद्द

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’च्या संसर्गामुळे ‘लॉकडाऊन’ची मुदत वाढविली आहे. परिणामी दहावीचे भूगोल व कार्यशिक्षण हे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले आहेत. नववी व अकरावीची दुसऱ्या सत्राची परीक्षा सुद्धा रद्द कऱण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad ) यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

नववी व अकरावीची दुसऱ्या सत्राची परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे पहिल्या सत्रातील परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रात गुण दिले जातील. दहावीची भूगोल व कार्यशिक्षण या विषयांची परीक्षाही रद्द झाली आहे. दहावीच्या या विद्यार्थ्यांना कसे गुण देणार याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ योग्य ती कार्यवाही करेल, असे वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad ) यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दहावीच्या रद्द केलेल्या भूगोल व कार्यशिक्षणाच्या गुणांबाबत येत्या दोन – तीन दिवसांत निर्णय जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Coronavirus : ‘नरेंद्र मोदींनी सामान्यांकडे दागिने मागण्यापेक्षा श्रीमंतांवर कर लावावा’

तीन पत्रकारांना कोरोनाची लागण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी