35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रभाषा विभागाचा तीन वर्षांचा कृती आराखडा तयार करा, सुभाष देसाई यांचे आदेश

भाषा विभागाचा तीन वर्षांचा कृती आराखडा तयार करा, सुभाष देसाई यांचे आदेश

टीम लय भारी
मुंबई:- मराठी भाषा विभागांतर्गत येत असलेल्या चार संस्थांच्या कामाचा आढावा व आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्य़क्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे, प्रा. लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सहसचिव मिलिंद गवादे, मीनाक्षी पाटील, संजय पाटील, शमाकांत देवरे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(Subhash Desai, Prepare three action plan language department)

राज्य शासनाच्या भाषा विभागाने मागील दोन वर्षांत उल्लेखनिय काम करत विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले. यापुढे मराठी भाषा विभागाला दिशा देणारा पुढील तीन वर्षांचा ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई य़ांनी दिले. तसेच  १५ फ्रेब्रुवारीपर्यंत हा अहवाल सादर करण्यात येईल, असे लक्ष्मीकांत देशमुख यांनी स्पष्ट केले. दरम्यान, २७ फेब्रुवारीपूर्वी मंत्रिमंडळाची प्रस्ताव मंजुरी घेण्यात यावी, असे नियोजन करण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी केल्या.

हे सुद्धा वाचा

मंत्रालय परिसरात ‘शांतता, मराठीचे कोर्ट चालू आहे’

काही उद्योजकांची संपत्ती कमालीची वाढली, असा हा विचित्र विरोधाभास : शिवसेना

दारूच्या दुकानांना देव देवतांची, महापुरूषांची नावे देण्यास बंदी, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra: BJP gets an upper hand in nagar panchayat elections in Beed

भाषा विभागांतर्गत असलेल्या चारही संस्थांनी आपल्या विभागाच्या बैठका घेऊन पुढील तीन वर्षांचा कार्यक्रम निश्चित करून भाषा विभागाला अधिक गतीमान करावे, असे देखील देसाई यांनी सांगितले.

मराठी भाषा धोरणाच्या अमंलबजावणीसाठी सुधारित मसूदा तयार करणे, अभिजात मराठी भाषा जन अभियान मोहिमेची प्रभावी अमंलबजावणी, मराठी बोलीभाषा संबंधी नवे उपक्रम आयोजित, मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यावर चर्चा करण्यात आली. मराठी भाषा धोरण तयार असून ते लवकरच जाहीर करण्याची सूचना श्री. सदानंद मोरे यांनी मांडली.

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर विविध योजना पूर्ण केल्या आहेत. अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आहेत. मराठी भाषा विभागासाठी मरिन ड्राइव्ह परिसरात मोक्याचा भूखंड मिळाला. उपक्रेंद्राचा प्रश्न मार्गी लागला. अभिजात मराठीसाठी जनजागृती मोहिम राबविली जात आहे. पुस्तकांचे गाव योजनेचा विस्तार, मराठी पाट्यांची सक्ती, सर्व माध्यमांच्या शाळांमधून मराठी भाषा शिकविणे सक्तीचे आदी महत्वाचे निर्णय़ मागील दोन वर्षांत घेतल्याचे भूषण गगराणी यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी