30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रElection : आता रंगणार 1,166 ग्रामपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम

Election : आता रंगणार 1,166 ग्रामपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम

आता ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला असून, 1,166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. तर नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल.

आता ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला असून, 1,166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. तर नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल.  18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांतील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. तर 14 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. अशी माहिती राज्य न‍िवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणुका लागू झालेल्या भागात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.नामनिर्देशन 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत होणार आहे.

24 आणि 25 सप्टेंबरला शनिवार, रव‍िवार असल्यामुळे नामनिर्देशन फॉर्म भरता येणार नाही. तसेच नामनिर्देशन फॉर्मची छाननी 28 सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची तारीख 30 सप्टेंबर आहे. त्याच दिवशी न‍िवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागर‍िकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

Rajesh Tope Vs Tanaji Sawant : राजेश टोपे यांच्यामुळे तानाजी सावंतांची पंचाईत

Dhule News : IAS अधिकाऱ्यांची डब्बा पार्टी!

Income tax : महाराष्ट्रातील बलदंड ठेकेदारावर इन्कम टॅक्सची धाड

या जिल्ह्यांतील तालुक्यात होणार निवडणुका :

कल्याण तालुका :-
कल्याण-7, अंबरनाथ-1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, शहापूर-79, पालघर, डहाणू- 62, विक्रमगड- 36,जव्हार- 47, वसई-11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी-11, वाडा-70,
रायगड :-अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल-4, पोलादपूर-4, महाड-1, माणगांव-3, श्रीवर्धन-1.
रत्नाग‍िरी :-मंडणगड – 2, दापोली – 4, खेड -7, चिपळूण – 1, गुहागर – 5, संगमेश्वर – 3, रत्नागिरी – 4, लांजा – 15, राजापूर -10.
सिंधुदुर्ग :- दोडामार्ग – 2, देवगड – 2.
नाशिक :-इगतपुरी – 5, सुरगाणा – 61, त्र्यंबकेश्वर – 57, पेठ – 71.
नांदुरबार :- अक्कलकुवा – 45, अक्राणी – 25, तळोदा – 55, नवापूर – 81.
पुणे :- मुळशी – 1, मावळ -1.
सातारा :- जावळी -5, पाटण – 5, महाबळेश्वर -6.
कोल्हापूर :-भुदरगड -1,राधानगरी – 1, आजरा -1, चंदगड – 1, भुदरगड – 1, राधानगरी -1, चंदगड – 1,
अमरावती :-चिखलदरा -1
वाशीम -1.
नागपूर :-रामटेक -3, भिवापूर -6, कुही -8.
वर्धा :- वर्धा -२, अर्वी – 7.
चंद्रपूर :- भद्रावती -2, चिमूर – 4, मूल – 3, जिवती – 29, कोरपणा – 25, राजुरा -30, ब्रह्मपुरी – 1.
भंडारा :-तुमसर -1, भंडारा – 16, पवणी – 2, साकोली -1.
गोंदिया :-देवरी – 1, गोरेगाव -1, गोंदिया -1, सडक अर्जुनी – 1, अर्जुनी मोर – 2.
गडचिरोली :-चामोर्शी – 2, आहेरी – 2, धानोरी – 6, भामरागड – 4, देसाईगंज 2, आरमोरी – 2, एटापल्ली – 2.
गडचिरोली -1.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी