29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रIncome tax : महाराष्ट्रातील बलदंड ठेकेदारावर इन्कम टॅक्सची धाड

Income tax : महाराष्ट्रातील बलदंड ठेकेदारावर इन्कम टॅक्सची धाड

राजस्थानच्या घोटाळयाचे कनेक्शन औरंगाबादमध्ये दडले आहे. औरंगाबादमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांनी आज पहाटेपासूनच धाड सत्र सुरू आहे.

राजस्थानच्या घोटाळयाचे कनेक्शन औरंगाबादमध्ये दडले आहे. औरंगाबादमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांनी आज पहाटेपासूनच धाड सत्र सुरू आहे. राजस्थानमधी ‘मिड डे मिल’ घोटाळयाचे कनेक्शन हे औरंगाबादमध्ये पोहोचले आहे. शहरातील अन्नधान्य पुरवठादार सतीश व्यास यांच्या संबंधीत ही कारवाई सुरू आहे. सतीश व्यास यांचे घर आणि कार्यालयावर चार ठिकाणी धाड टाकण्यात आली. औरंगाबादमध्ये झडतीसाठी सुमारे 14 अधिकारी आले आहेत. एकूण चार ठिकाणी मिळून 56 अधिकारी छापेमारी करत आहेत. ‘मिड डे मिल’ म्हणजे हा ‘अन्नधान्य घोटाळा’ आहे. सतीश व्यास यांच्याकडे राजस्थानमधील अन्नधान्य पुरवठयाचा ठेका असल्याचा संशय आहे.

सतिश व्यास यांच्या घरी महत्त्वाची कागदपत्रे मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानमधील मिड डे मिल योजने विषयी देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. राजस्थानचे राज्यमंत्री राजेंद्र यादव यांच्या मालमत्तांवर देखील इन्कम टॅक्सने छापेमारी केली आहे.  मुंबई, जयपूर, बंगळुरूसह, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशात छापेमारी सुरु आहे.

हे सुद्या वाचा

political party : 138 कोटी लोकसंख्येच्या देशात सुमारे 2044 राजकीय पक्ष

Mahadev Jankar : महादेव जानकर हे निर्मला सीतारमण यांच्यापेक्षाही सरस !

Radhika Apte : ‘या’ लाडक्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस

राजकीय फंड, टॅक्स न भरणे तसेच दारु घोटाळया सारखी अनेक प्रकरणे या धाडीमध्ये उघड होणार आहेत. या धाडीमध्ये विविध पक्षांतील मोठया नेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तसगढ, उत्तराखंडासह 7 राज्यांत इनकम टॅक्सने धाडी टाकल्या आहेत. जयपूरजवळ कोटपूतली येथे गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव यांची पाटर्नर शीप असलेल्या एका कंपनीवर धाड टाकण्यात आली आहे. राजेंद्र यादव आणि त्यांच्या नातेवाईक मिळून एकूण 53 ठिकाणी या धाडी पडल्या. सकाळी 5 वाजता मिड डे मीलवर इनकम टॅक्सने धाड टाकली. तसेच महाराष्ट्रातील काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी