34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रअतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतक-याला दिवाळीपूर्वी मदत नाहीच, राज्य सरकारचे आता निवडणूक आयोगाकडे...

अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतक-याला दिवाळीपूर्वी मदत नाहीच, राज्य सरकारचे आता निवडणूक आयोगाकडे बोट

टीम लय भारी

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतक-याला दिवाळीपूर्वी मदत केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली होती. मात्र आता याच घोषणेपासून सरकारने घूमजाव करताना निवडणूक आयोगाकडे बोट दाखविले आहे. त्यामुळे शेतक-यांची दिवाळीही कडूच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेतक-यांना दिवाळी आधी मदत देण्याची आमची तयारी आहे. मात्र निवडणूक जाहीर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगला याबाबत कळवले आहे. पॅकेजची आम्ही आधीच घोषणा केली होती. राज्य निवडणूक आयोगाने सांगितले, तुमचा प्रस्ताव आम्हाला द्या, तो केंद्रीय निवडणूक आयोगाला देतो. त्यांनी परवानगी दिली की मदत देऊ, असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी स्पष्ट केले. वडेट्टीवार यांच्या घोषणेमुळे शेतक-यांच्या मदतीचा चेंडू सरकारने निवडणूक आयोगाच्या कोर्टात ढकलल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी शेतक-यांना मदत करणार असल्याची घोषणाही यामुळे हवेतच विरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य सरकारला 2020 मध्ये अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. प्रत्येक नैसर्गिक संकटानंतर राज्याने केंद्राला मदतीसाठी पॅकेजची मागणी केली. पण केंद्राकडून राज्याला एकही पैसा आलेला नाही. 1065 कोटी निसर्ग चक्रीवादळ मदत मागितली, 814 कोटी पूर्व विदभार्तील पूर, दोन्ही वेळा टीम आली. प्रस्ताव पाठवले पण अजून एक रुपया मदत आलेली नाही, असे वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे. एकूणच शेतक-यांना मदत न करता आपल्या अपयशाचे खापर केंद्रावर फोडण्याचा राज्य सरकारचा डाव स्पष्ट झाला आहे.

अतिवृष्टी झाल्यावर केंद्रीय पथकाने राज्यात पाहणीसाठी यावे म्हणून मुख्य सचिव यांनी पत्र पाठवले. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना 15 ऑक्टोबरला केंद्रीय पथक पाठवावे म्हणून पत्र लिहिले. पण अजून ही केंद्रीय पथक आलेले नाही. अतिवृष्टी होऊन 15 दिवस झाले केंद्राचे पथक नाही आणि याआधी झालेल्या नुकसानसाठी एक रुपयांची मदत नाही, असं वड्डेटीवार यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी