29 C
Mumbai
Wednesday, August 30, 2023
घरमहाराष्ट्रशरद पवारांच्या मदतीला उद्धव ठाकरे धावले !

शरद पवारांच्या मदतीला उद्धव ठाकरे धावले !

अजित पवार गटाने वेगळी चूल मांडल्यापासून शरद पवार यांच्या भूमिकेविषयी लोकांच्या मनात संभ्रम आहे. अजित पवार यांना शरद पवारांचा छूपा पाठिंबा आहे, अशी कार्यकर्ते व हितचिंतकांमध्ये चर्चा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर अजित पवार गटाला जनता आगामी निवडणुकीत जागा दाखवून देईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. मात्र शिवसेना व काँग्रेस यांच्यामध्येही आपल्या भूमिकेविषयी संभ्रम असल्याचा दुसरा अवघड प्रश्न पत्रकारांनी विचारला. पण त्यावर उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केली. ही पत्रकार परिषद इंडियाबाबत आहे. त्यामुळे अन्य विषयावर प्रश्न विचारणे योग्य नाही, असे ठाकरे म्हणाले. त्यामुळे पवार यांच्या मदतीला उद्धव ठाकरे धावून आल्याचे चित्र दिसले.

जलसंपदा घोटाळा व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याची चौकशी नरेंद्र मोदी सरकारने करावी, असे थेट आव्हान सुद्धा शरद पवार यांनी दुसऱ्या एका प्रश्नाच्या वेळी यावेळी दिले. शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव घेतले नाही. परंतु जलसंपदा व शिखर बँकेचा उल्लेख करून त्यांनी थेट अजित पवारांवरच तोफ डागली.

विरोधी पक्षांची एकजूट असलेल्या ‘इंडिया’ची बैठक ग्रँट हयात हॉटेलमध्ये सुरू होणार आहे. या संभाव्य बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासह विविध नेते उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा 
प्रकाश आंबेडकरांचा ‘इंडिया’त समावेश होणार का ?, उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे संकेत
पंकजा मुंडे यांनी साजरा केला रक्षाबंधन, जाणून घ्या भावाचे नाव
लोकसभा, विधानसभेसह महापालिकेच्याही निवडणुका…

इंडियातील घटक पक्ष एकत्र येवून पुढील निवडणुका लढवणार आहोत. पहिल्या दोन बैठका एकत्र येण्याच्या दृष्टीने महत्वाच्या होत्या. निवडणुका कशा लढायच्या, जागा वाटप कसे करायचे याबाबत मुंबईतील या बैठकीत चर्चा होऊ शकते, असेही शरद पवार म्हणाले. मायावती यांचा भाजपसोबत सुसंवाद आहे. त्यामुळे त्यांची नक्की भूमिका काय आहे हे समजून घेतल्यानंतर त्यांच्याही इंडियातील समावेशाविषयी निर्णय घेतला जाईल, असे पवार म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी