33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रUnlock 5 : कामगार आलेले नाहीत अन् भाडेही थकलेय; हॉटेल कसे सुरु...

Unlock 5 : कामगार आलेले नाहीत अन् भाडेही थकलेय; हॉटेल कसे सुरु करणार?

केवळ ३० ते ४० टक्के बार, रेस्टॉरंट होणार सुरू; ‘आहार’ची माहिती

टीम लय भारी

मुंबई : राज्य सरकारने सोमवार, ५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला (Unlock 5) आहे. पण कामगार अद्याप आले नाहीत तसेच अनेक रेस्टॉरंट आणि बारचे भाडे थकल्याने रेस्टॉरंट सुरू करता येणार नाहीत. त्यामुळे सोमवारी राज्यातील केवळ ३० ते ४० टक्के बार आणि रेस्टॉरंट सुरू होतील, अशी माहिती ‘आहार’चे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी दिली.

मुंबईत ३३ टक्के तर राज्यात ५० टक्के क्षमतेने बार, रेस्टॉरंट सुरू होणार आहेत. ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल चाचणी करण्यासह खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे.

याबाबत शिवानंद शेट्टी म्हणाले, एकूण कामगारांपैकी ७० टक्के कामगार स्थलांतरित आहेत. त्यांना परत येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था नाही. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. तर काही जणांना मालकाशी रेस्टॉरंटच्या थकलेल्या भाड्याबाबत तडजोड झाली तरच त्यांना हॉटेल सुरू करता येणार आहे. अन्यथा ते बंद राहतील.

…तर परवाना रद्द होणार!

मुंबईत रेस्टॉरंट, बार ३३ टक्के क्षमतेवर सुरू करण्यास परवानगी आहे. ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्स पाळणे, तीन फुटांचे अंतर ठेवणे, जागेचे निर्जंतुकीकरण, स्क्रीनिंग बंधनकारक आहे. नियम मोडल्यास परवाना रद्द करणे, दंड वसूल करणार असल्याची माहिती मुंबई पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

एसओपीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह यांनी आदरातिथ्य क्षेत्रातील विविध उपहारगृहे आणि हॉटेल संघटनांना पत्राद्वारे नियमावलीची माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एसओपीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे रेस्टॉरंटस् (कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, परवानाधारक फूड अँड बेव्हरेजेस (एफ अँड बी) युनिटस्/आऊटलेटस्, हॉटेल/रिसॉर्ट/क्लब यांचा अंतर्गत किंवा बाह्य भाग यांसह) आणि बार यांनी तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

अशी आहे नियमावली

  • उपहारगृहांचा दरवाजा कर्मचा-यांपैकीच कोणी उघडावा.
  • प्रत्येक ग्राहकाची प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग केली जावी. ग्राहकाला कोरोनाची लक्षणं आहेत का नाही याची पडताळणी व्हावी.
  • कोणतीही लक्षणं नसलेल्या ग्राहकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावा.
  • ग्राहकांना सेवा पुरवताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं.
  • हॉटेल, उपहारगृहांमध्ये आलेल्या ग्राहकांची नोंद ठेवावी.
  • कोणत्याही ग्राहकांना मास्क शिवाय परवानगी दिली जाऊ नये. केवळ अन्नपदार्थांचं सेवन करताना मास्क काढण्याची परवानगी असेल.
  • ग्राहकांना शक्यतो मास्क, ग्लोव्ह्ज आणि इंन्स्टन्ट हँटवॉश आणण्याचा आग्रह करावा.
  • प्रत्येक ग्राहकासाठी सॅनिटायझरची सोय करण्यात यावी.
  • पैसे स्वीकारण्यासाठी जास्तीतजास्त डिजिटल पद्धतीचा वापर करण्यात यावा.
  • पैसे स्वीकारणाऱ्या व्यक्तीनं सातत्यानं सॅनिटायझरचा वापर करावा.
  • शौचालय किंवा हात धुण्याच्या जागेची वारंवार पडताळणी करण्यात यावी. त्या ठिकाणी कायम स्वच्छता ठेवावी.
  • कर्मचारी आणि ग्राहक यांच्या शक्यतो कमी संपर्क असावा.
  • सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असावे.
  • मुंबई हॉटेल उपहारगृहं सुरू झाल्यानंतर जाण्यापूर्वी आपली नोंदणी करणं आवश्यक असेल.
  • ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश नाकारण्यात यावा.
  • दोन टेबलांमध्ये सुरक्षित अंतर असावं.
  • टेबल आणि किचनची वेळोवेळी स्वच्छता होणं आवश्यक आहे.
  • कर्मचा-यांचीही वेळोवेळी वैद्यकीय तपासणी अथवा कोरोनाची चाचणी करणं आवश्यक असेल. गरज भासल्यास कोरोनाच्या मदत संपर्क केंद्रावर संपर्क साधावा.
  • बसण्यापूर्वी टेबलवर कोणत्याही प्लेट, ग्लास, मेन्यू कार्ड, टेबल टॉबल टॉप अथवा कोणत्याही वस्तू असू नयेत. कापडाच्या नॅपकिन ऐवजी विघटनशील कपड्याचा वापर करावा.
  • क्युआर कोडच्या स्वरूपात मेन्यू कार्ड देण्याचा प्रयत्न करावा.
  • सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी जमिनीवरही खुणा करण्यात याव्यात.
  • शक्यतो एसीचा वापर टाळावा. आवश्यकता असल्यास सतत त्यांची सफाई करत राहावी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी