31 C
Mumbai
Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रभारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता लवकरच भारताचे अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोचणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केले ते नाशिक येथे आयोजित प्रज्ञावंतांच्या संमेलनात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश भाजप सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, प्रदेश सहसंयोजक वैद्यकीय आघाडी उपाध्यक्ष मंजुषा दराडे ,नाशिक प्रज्ञावंत सेलचे सहाय्यक श्रीधर व्यवहारे, नाशिक दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव , महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडी च्या संयोजिका चंचल साबळे, नाशिक महानगर आयुष्यमान भारत योजनेचे संयोजक डॉक्टर वैभव जोशी, डॉक्टर विनय मोगल,

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India’s economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता लवकरच भारताचे अर्थव्यवस्था(India’s economy ) तिसऱ्या क्रमांकावर  पोचणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड ( Bhagwat Karad) यांनी केले ते नाशिक येथे आयोजित प्रज्ञावंतांच्या संमेलनात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश भाजप सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, प्रदेश सहसंयोजक वैद्यकीय आघाडी उपाध्यक्ष मंजुषा दराडे ,नाशिक प्रज्ञावंत सेलचे सहाय्यक श्रीधर व्यवहारे, नाशिक दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव , महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडी च्या संयोजिका चंचल साबळे, नाशिक महानगर आयुष्यमान भारत योजनेचे संयोजक डॉक्टर वैभव जोशी, डॉक्टर विनय मोगल,(India’s economy is set to grow to number three; Bhagwat Karad)

नाशिक महानगर वैद्यकीय आघाडी प्रभारी डॉक्टर चंद्रशेखर नामपुरकर, भाजप नाशिक महानगर सरचिटणीस सुनील केदार अडवोकेट शाम बडोदे , सोनल दगडे आदी उपस्थित होते

यावेळी नामदार भागवत कराड ( Bhagwat Karad) पुढे म्हणाले की काँग्रेस व त्यांच्या आघाडी पक्षांचे सरकार अनेक महाकाय घोटाळ्यांनी गुंफलेले सरकार होते. त्या सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्टाचार मध्ये अडकलेले होते. त्या काळात कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचार होत असत परंतु मोदी सरकारच्या नेतृत्वात असलेल्या सरकारमध्ये एकही घोटाळा झालेला नाही गेल्या दहा वर्षाच्या काळात या सरकारच्या पारदर्शक कारभारातूनच सरकारने अर्थव्यवस्थेत उत्तुंग झेप घेतली, हा खाऊंगा ना खाने दुंगा हे मोदी साहेबांचे ब्रीदवाक्य असल्यामुळे अनेक भष्टाचारी ना त्यांनी गजाआड केले आहे. इ गव्हर्नर च्या माध्यमातून वेळेची बचत व कार्यपद्धतीत पारदर्शकता व विना विलंब महत्त्वपूर्ण निर्णय होतात मोदी सरकारच्या विविध मंत्रालयातील आपापसातील समन्वयामुळे कामकाज पद्धती गतिमान झालेली असल्याचे भागवत कराड ( Bhagwat Karad) म्हणाले. यावेळी भागवत कराड ( Bhagwat Karad) म्हणाले की वेगवेगळ्या मंतलयांच्या कार्यपद्धतीमध्ये अमुलाग्र बदल घडवून आलेले आहेत म्हणूनच कारभारामध्ये गतिमानता आली आहे. त्याचाच परिपाक म्हणून भारताची अर्थव्यवस्था तीन पटीने वाढली आहे म्हणजे भारताचं महसूल १६ लाख कोटींवरून ४९ लाख कोटींवर पोहोचला आहे. म्हणजेच दरडोई उत्पन्न तीन पटीने वाढले असल्याचे ते ( Bhagwat Karad) म्हणाले. त्यामुळे जगाच्या पाठीवर भारताची अर्थव्यवस्था जगाच्या पाठीवर एक मजबूत अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आली आहे. आहे.पूर्वी आतंकवादी आपल्या देशात घुसून अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणत परंतु आता आपले शूरवीर शत्रू राष्ट्रांच्या हद्दीत जाऊन त्यांचा खात्मा करतात.

यावेळी त्यांनी एडवोकेट श्रीधर व्यवहारे यांनी उपस्थित केलेल्या बंद कारखान्याच्या पुनर्जीवनासाठी सरकारने पुढाकार घ्यावा असे सांगितले असता त्यांनी त्यासाठी आपण लवकरात लवकर यथोचित पावले उचलू असे भागवत कराड म्हणाले. नाशिक पुणे रेल्वेचे काम प्रगती पथावर असलेले सांगून महाराष्ट्रातील अनेक रेल्वे प्रकल्पांसाठी भरघोस निधी दिल्याचे भागवत कराड  म्हणाले. यावेळी प्रदेश मुख्य सहप्रवक्ते अजित चव्हाण यांनी बुद्धिवंत सेलच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच बुद्धिवंत सेल महाराष्ट्रात महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे  त्यांनी प्रतिपादन केले.

यावेळी एडवोकेट धर्मेंद्र चव्हाण नानासाहेब जाधव राजेंद्र उपासने एडवोकेट विलास डोंगरे विजय निकुंभ सुनील बच्छाव डॉ वैभव जोशी सुनील केदार तसेच एडवोकेट श्रीधर व्यवहारे यांनी नाशिकच्या प्रगतीच्या साठीच्या विचारलेल्या विविध प्रश्नांवर नामदार भागवत कराड व अजय चव्हाण यांनी समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमात प्रास्ताविक मंजुषा डॉक्टर मंजुषा दराडे यांनी केले प्रास्ताविक वर भाषणातून त्यांनी वैद्यकीय सेल अभियंता असेल कायदा आघाडी यांच्या आपापसातील समन्वयाच्या माध्यमातून विविध चर्चासत्रे व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सूत्रसंचालन डॉक्टर वैभव जोशी यांनी केले तर आभार सुनील केदार यांनी मानले बैठकीस डॉक्टर विश्वनाथ पाटील उमेश पवार, अतुल धामणे, डॉक्टर अमोल पुरी डॉक्टर शाम थविल डॉक्टर श्याम देशमुख डॉक्टर जयेंद्र थविल , संदीप जोशी, सुनील वाघ यांचे नाशिक महानगरातील डॉक्टर इंजिनियर्स वकील तसेच प्रज्ञावंत सेलचे १५० हून अधिक सदस्य उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी