33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रविराट कोहलीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, लस घेतल्यानंतर चाहत्यांसाठी स्पेशल मॅसेज

विराट कोहलीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, लस घेतल्यानंतर चाहत्यांसाठी स्पेशल मॅसेज

टीम लय भारी

मुंबई :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना लसीचे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे (Indian cricket captain Virat Kohli has taken the first dose of corona vaccine).  

सोशल मीडियाद्वारे त्याने आपल्या चाहत्यांना लस (Vaccine) घेतल्याचे सांगितले आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कोरोना लस (Corona Vaccine) घेतलेला फोटो पोस्ट केला आहे. लस (Vaccine) घेतल्याबरोबर त्याने आपल्या चाहत्यांना देखील शक्य असेल तितक्या लवकर लस (Vaccine) घेण्याचे आवाहन केले आहे.

सु्प्रीम कोर्टाला टास्क फोर्स स्थापना करावी लागते, केंद्र सरकार काय करतेय ? : बाळासाहेब थोरातांचा सवाल

कोरोनाच्या औषधे आणि लसीवर जीएसटी रद्द केला तर, किंमत वाढेल: निर्मला सीतारामन

Kohli & Current Indian Cricketers Who Got Vaccinated | PICS

इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी खेळाडू घेत आहेत लस

भारतीय संघाचा तडाखेबाज सलामीवीर शिखर धवन, मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) देखील आज लस (Vaccine) घेतली.  इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी भारतीय संघातील खेळाडू कोरोना लसीचा (Vaccine) पहिला डोस घेत आहेत.

शिखर, रहाणे, इशांतने घेतली लस

आयपीएल स्थगित झाल्यानंतर सध्या सगळे खेळाडू आपापल्या घरीच आहेत. अशावेळी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन खेळाडूंनी लस (Vaccine) घ्यावी, अशा सूचना बीसीसीआयने दिल्या आहेत.  7 मे रोजी शिखर धवनने दिल्लीत कोरोना लसीचा (Corona Vaccine) पहिला डोस घेतला. तसेच 8 मे रोजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने मुंबईत लस (Vaccine) टोचून घेतली. रहाणे भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तिथे तो 3 महिने भारतीय संघासोबत असणार आहे.

रवी शास्त्री यांनी घेतली कोरोना लस

दुसरीकडे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मार्च महिन्यातच कोरोना लस (Corona Vaccine) घेतली होती. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान अहमदाबाद येथे शास्त्री यांनी कोरोना लस (Corona Vaccine) घेतली होती. 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना कोरोना लस (Corona Vaccine) दिली जात होती, त्यावेळी शास्त्री यांनी कोरोना लस (Corona Vaccine) घेतली.

खेळाडूंच्या लसीकरणाविषयी बीसीसीआयचा प्लॅन काय?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याअगोदर भारतीय खेळाडूंच्या लसीकरणाविषयी काय प्लॅन आहे?, असा प्रश्न बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना गांगुलीने संपूर्ण प्लॅन सांगितला.

“भारतीय खेळाडूंजवळ आता वेळ आहे. व्यक्तिगत पातळीवर ते स्वत: लस (Vaccine) घेऊ शकतात. सगळे खेळाडू आपापल्या घरी गेले आहेत. त्यामुळे लस (Vaccine) घेणे त्यांच्यासाठी अधिक सोपे झालेय”, असे सौरव गांगुली म्हणाला.

खेळाडूंना फक्त कोविशिल्ड लसच घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोविशिल्ड लस (Vaccine) घेणे केवळ त्याच क्रिकेटपटूंसाठी आवश्यक आहे जे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड मालिकेत भाग घेऊ शकतात.

भारतीय खेळाडूंनी कोविशिल्डचा पहिला डोस भारतात घेतल्यास त्यांना दुसरा डोस इंग्लंडमध्ये घेता येईल. ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेकाचे कोविशिल्ड हे प्रोडक्ट असल्याने इंग्लंडमध्ये असताना भारतीय खेळाडू कोविशिल्डचा दुसरा डोस घेऊ शकतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी