30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्र“तोल ढासळलेल्या व्यक्तीवर उपचार करायचे असतात”;संजय राऊतांची चंद्रकांत पाटीलांना बोचरी टिका

“तोल ढासळलेल्या व्यक्तीवर उपचार करायचे असतात”;संजय राऊतांची चंद्रकांत पाटीलांना बोचरी टिका

टीम लय भारी

मुंबई :- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टीका केली होती. सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे पंतप्रधांनांना पत्र लिहतील असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. तोल ढासळलेल्या व्यक्तीवर बोलणे योग्य नाही, त्यांच्यावर उपचार करायचे असतात अशी बोचरी टिका संजय राऊतांनी लगावला आहे (It is not right to talk about a person who has lost his balance, he wants to be treated, says Sanjay Raut).

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटलांवर (Chandrakant Patil) निशाणा साधला. तुम्हीच म्हणालात ना चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे. मग तोल ढासळलेल्यांवर बोलायचे नसते. त्यांच्यावर उपचाराची गरज असते, अशी खोचक टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

चंपा तुमचा तोल ढळलाय, शिवसेनेचे टीकास्त्र

अर्थसंकल्पनेच्या मुद्द्यावरून पी चिदंबरम यांचा भाजपला खोचक टोला

New IT rules not applicable to us, we are a search engine, Google tells Delhi High Court

फडणवीस माझ्यावरच टीका करणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचाही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समाचार घेतला. फडणवीस माझ्यावरच निशाणा साधतील. त्यांची टीका मी गंभीरपणे घेत नाही. ते माझे मित्र आहेत. मित्र राहतील. त्यांचे दु:ख मी समजू शकतो. माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली. ते सत्तेत येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते दु:खी आहेत. पण माझ्यावर टीका करण्यात त्यांना आनंद वाटत असेल तर त्यांनी खुशाल टीका करावी. पुढील साडेतीन वर्षे टीका करून त्यांनी आनंद घ्यावा, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

निवडणुकांवरून संभ्रम नको

मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट घातला जात असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. विरोधी पक्षाला निवडणुकीची एवढी घाई का झाली आहे. त्यांना कुणी सांगितले अशाप्रकारचा काही निर्णय होत आहेत? त्यांच्या हेरांनी… ज्या काही गुप्तहेरांनी त्यांना माहिती दिली असेल तर ती चुकीची आहे. निवडणुकांचे काय होणार हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि निवडणूक आयुक्तच सांगतील. ते अधिकारीक व्यक्ती आहेत. तुम्ही कशाला जनतेत संभ्रम निर्माण करत आहात, असा सवालही संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला.

एक दिवस मातोश्रीवरही येतील

फडणवीस हे काल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी गेले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केले. विरोधी पक्ष आता जमिनीवर येत आहे हे चांगले आहे. लोकशाहीत कोणी कुणाचा शत्रू नसतो. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे. ते खडसेंच्या घरी गेले, त्याचे स्वागत आहे. त्याआधी ते शरद पवारांना जाऊन भेटले. त्यांचे मार्गदर्शन घेतले असेल. मागे आम्ही भेटून लंचही घेतले होते. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. कशाला धुरळा उडवता?, असेही टोलाही संजय राऊतांनी (Sanjay Raut) लगावला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी