महाराष्ट्र

Solapur Mahanagarpalika : महिला आयुक्तांनी स्वीकारला सोलापूर महापालिकेचा पदभार

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांची गुरुवारी (ता. 17 नोव्हेंबर) सायंकाळी नागपुर येथे बदली झाल्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर या जागी महिला अधिकारी शीतल उगले यांची सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले. शीतल उगले यांची आयुक्त पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सोमवारी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी सोलापूर महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे औक्षण करून सुलापूर महानगरपालिकेत स्वागत केले. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिन्द्र घोलप, नगर अभियंता संदीप कारंजे आणि इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

सोमवारी सकाळी 11 वाजता शीतल उगले यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर शीतल उगले म्हणाल्या की, सोलापूर महानगरपालिकेत मी पहिलीच महिला आहे जी आयुक्त म्हणून नियुक्त झाल्याची माहिती मिळाली आहे. परंतु या पदावर नियुक्त होणारी व्यक्ती ही कोणतीच स्त्री आहे की पुरुष याला महत्व नसते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच या पदावर नियुक्ती झाल्याने आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शीतल उगले पुढे म्हणाल्या की, लवकरच सोलापूर महानगरपालिकेत घडणाऱ्या गोष्टींचा आढावा घेणार असून नागरिकांचे जीवन कशा पद्धतीने सुखकर करण्यात येईल, या गोष्टीकडे लक्ष देण्यात येईल. त्याचप्रमाणे शहरातील समस्यांकडे लक्ष देऊन त्या मार्गी लावणार असल्याचे देखील शीतल उगले यांनी सांगितले. दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेचे आधीचे आयुक्त पी. शिवशंकर यांची आयुक्त पदावरून नागपूर येथे वस्त्रोद्योग उपसंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पी. शिवशंकर यांनी त्यांच्या कार्यकाळात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूर शहरात अनेक विकासकामे केली आहेत. ज्यामुळे सोलापूर शहराचा मोठा कायापालट झालेला पाहायला मिळाला.

हे सुद्धा वाचा

Maharashtra News : सामान्य माणसाला समोर ठेवून पत्रकारांनी काम करावे – डॉ. नीलम गोऱ्हे

Russia Ukraine war : युद्धाच्या धामधूमीत ब्रिटनचे पंतप्रधान युक्रेनच्या दौऱ्यावर

Anil Parab Bail : अनिल परब यांना मोठा दिलासा; रिसॉर्ट प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथम महिला आयुक्तपदी रुजू झाल्याबद्दल शितल (तेली) उगले यांचा ट्रेड युनियनच्या वतीने स्वागत आणि त्यानंतर सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले,महिला प्रमुख संघटक अंजली काकडे,कार्याध्यक्ष योहान कानेपागुलु,गौतम नागटिळक ,पिंटू जेटीथोर, चंद्रकांत रणदिवे,राजश्री सगर,क्षमा डबारे, संगीता गुरव,संगीता लेकुरवाळे युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

पूनम खडताळे

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

7 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

7 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

8 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

8 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

8 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

10 hours ago