33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयलसींच्या तुटवड्यावरुन ममता बॅनर्जीचा मोदींवर निशाणा

लसींच्या तुटवड्यावरुन ममता बॅनर्जीचा मोदींवर निशाणा

टीम लय भारी

मुंबई :- केंद्र सरकार विरुद्ध पश्चिम बंगाल सरकार हा वाद दिवसेंदिवस शिगेला पोहोचत चालला आहे. लसींच्या तुटवड्यावरून ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला चांगलेच सुनावले आहे. राज्यांना लस उपलब्ध होत नसताना संपूर्ण देशाचे डिसेंबरपर्यंत लसीकरण कसे करणार?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे (West Bengal Chief Minister Mamata Banerjee has once again targeted the Modi government).

“केंद्र सरकार खूप काही सांगते. पण तसे होत नाही. वचनबद्धता असली पाहीजे. लस संपूर्ण देशाला पुरवणे मोठे काम आहे. राज्यांना लस पुरवू शकत नाहीत. तर डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण कसे करणार?”, असा प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांनी उपस्थित केला. लसीकरणाबाबत ओडिसा आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने सर्व राज्यांना मोफत लस दिली पाहीजे असे सर्वांचे म्हणणे आहे.

पंकजाताईंना पाच वर्षात जमलं नाही, धनंजय मुंडेंनी दीड वर्षात करून दाखवलं!

प्रियांका गांधींची नरेंद्र मोदींवर लसीकरण मोहिमेवरून परखड शब्दांत टीका

अल्पन बंडोपाध्याय मुद्द्यावरून गेल्या काही दिवसात केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यात वाद वाढला आहे. “हे प्रकरण आता संपले आहे. यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही”, असे सांगत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उपरोधिक उत्तर दिले.

देशातल्या लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या २१ कोटी ८५ लाख ४६ हजार ६६७ झाली आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत लस घेतलेल्या नागरिकांची संख्या दोन कोटी २८ लाख ३२ हजार ७४३ झाली आहे. त्यापैकी एक कोटी ८२ लाख १६ हजार ५०३ लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला तर ४६ लाख १६ हजार २४० लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लसींचा दुसरा डोस घेतला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी