33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रलॉकडाऊन : मजुरांच्या एसटीला यवतमाळमध्ये भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!

लॉकडाऊन : मजुरांच्या एसटीला यवतमाळमध्ये भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!

लय भारी टीम

यवतमाळ : कोरोनाचा कहर सुरु असताना गावी परतणा-या नागरिकांना अपघाताचाही सामना करावा लागत आहे. स्थलांतरित मजुरांच्या वाहनांना दररोज अपघात होत आहेत. सोलापूरहून कामगारांना झारखंडला घेऊन जाणाऱ्या एसटी बसची टिप्परला धडक बसून यवतमाळमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये बसमधील चौघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला.

मजुरांना आपल्या मूळगावी घेऊन जाणाऱ्या एसटी बसने टिप्परला मागून धडक दिली. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णीजवळील कोळवन गावानजीक हा अपघात झाला. सोलापूरहून निघालेले मजूर एसटी बसने झारखंड राज्यात जात होते. ही धडक इतकी भीषण होती, की बसमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 22 जण जखमी आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी आर्णी आणि यवतमाळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यात मजुरांनी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला होता. एका मालवाहू ट्रकने मजुरांनी भरलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला होता. या दुर्घटनेत 23 मजुरांचा जागेवर मृत्यू झाला तर एका मजुराचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता. दररोज  मजूर अपघातात ठार होत असल्यामुळे सरकारचीही चिंता वाढली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी