31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeमंत्रालयPoliceDuty : मंत्रालयातील 1400 कर्मचा-यांना पोलिसांची ड्यूटी

PoliceDuty : मंत्रालयातील 1400 कर्मचा-यांना पोलिसांची ड्यूटी

टीम लय भारी

मुंबई : परराज्यात जाऊ इच्छिणा-या श्रमिकांच्या माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि मुंबई मधील पोलिसांना सहाय करण्यासाठी अधिकच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. सदर प्रयोजनासाठी मंत्रालयीन विभागातील ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे असे 1400 अधिकारी व कर्मचा-यांना पोलिसांची ड्यूटी (Police Duty) लावण्यात आली आहे. तसेच 31 मे अथवा पुढील आदेशापर्यंत ही सेवा पोलीस आयुक्त मुंबई शहर यांना उपलब्ध करुन देण्यात येईल, असा आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे काढण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त, मुंबई शहर यांनी या अधिकारी/ कर्मचारी यांना पोलीस स्टेशनला नियुक्ती द्यावी. त्यांना कामाचे वाटप करावे. तसेच अन्य प्रशासकीय कामे (Police Duty) देखील आवश्यकतेनुसार देण्यात यावीत, असे या आदेशात म्हटले आहे.

सदर अधिकारी/ कर्मचारी यांना या आदेशाच्या म्हणजेच 19 मे पासून मंत्रालयातील कामकाजातून कार्यमुक्त करण्यात येत असून, मंत्रालयीन विभागांनी स्वतंत्रपणे कार्यमुक्तीचे आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता नाही. नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांनी पोलीस आयुक्त, मुंबई शहर यांच्या संदेशानुसार नेमणूक केलेल्या ठिकाणी त्यांनी कर्तव्यावर हजर व्हावे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार या कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येत असल्याने त्यांनी रुजू होणे अनिवार्य आहे.

पोलीस आयुक्त, मुंबई शहर यांनी रुजू न होणा-या अधिकारी/ कर्मचा-यांची माहिती तात्काळ सामान्य प्रशासन विभागाला कळवावी. रुजू न होणा-या कर्मचा-यांविरुध्द म.ना.से.(शिस्त व अपील) नियम 1979 मधील नियम 8 अन्वये शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येइल. तसेच सदर अधिकारी/ कर्मचारी भारतीय दंड संहिता 1860 (45) कलम 188 नुसार दंडनीय/ कायदेशीर कारवाई करण्यास पात्र राहतील, असे ही या आदेशात म्हटले आहे.

gr upload

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी