30 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
HomeमुंबईShocking : मुंबईत 15 लाख रुग्ण, आमदार नितेश राणे यांचा दावा

Shocking : मुंबईत 15 लाख रुग्ण, आमदार नितेश राणे यांचा दावा

टीम लय भारी

मुंबई : मुंबईत 15 लाख रुग्ण असल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. याआधी नितेश राणे यांनी सायन रुग्णालयात कोरोनाच्या (Coronavirus) मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता.

‘मुंबईत 15 लाख प्रकरणे आहेत ???
कोणीतरी ते खरे नाही याची पुष्टी करू शकेल ?? अन हे सिद्ध करा !!
शांतता मदत करणार नाही कारण तो बीएमसी मधील गोंगाट आहे !!
का लपवताय अखेरीस आम्हाला ते कळेलच ‘ असे नितेश राणे यांनी ट्विट केले आहे.

राज्यावर सध्या कोरोनाचे (Coronavirus) मोठे संकट आले आहे. राज्यासह मुंबईतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढताना दिसत आहे. मुंबईमधून गावी जाणारे बरेच जण कोरोनाचे रुग्ण निघत आहेत. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी मुंबईत 15 लाख प्रकरणे आहेत का ? कोणीतरी ते खरे नाही याची पुष्टी करू शकेल? असा सवाल केला आहे.

आमदार नितेश राणे यांनी आधीही महाराष्ट्र सरकार जे सांगत आहे. ते आकडे खरे नाहीत. मुंबईत कोरोना (Coronavirus) व्हायरसच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. सरकारकडून आकडे लपवले जात असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी