28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमंत्रालयएकनाथ शिंदेंनी बायको, सुन, नातवंडाला मंत्रालयात नेले, अन् काम सुरू केले !

एकनाथ शिंदेंनी बायको, सुन, नातवंडाला मंत्रालयात नेले, अन् काम सुरू केले !

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आज गुरुवारी मंत्रालयातील कामकाज हातात घेतले. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी लगेच त्यांच्या कामाला सुरुवात केली होती. पण आज गुरुवारी प्रथमतःच त्यांनी मंत्रालयात हजेरी लावली. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब देखील उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी ३० जूनला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेच त्यांनी बैठका घेऊन कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. पण आज प्रत्यक्षरित्या ते राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या दालनात हजर झाले. यावेळी त्यांची पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत इतर आमदारही उपस्थित होते. उपस्थित आमदारांनी यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. त्यांनी बंडखोरी केल्यानंतर लोकांनी त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. त्यांच्यासोबत अनेक आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यातील सरकार पडले आणि राज्यात असंतोषाची लाट पसरली. या राजकीय भूकंपानंतर जनतेमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळाला. पण मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळायला घेतल्यानंतर त्यांनी जनतेमध्ये आपली मलीन प्रतिमा सुधारविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

हे सुद्धा वाचा :

एकनाथ शिंदेंमुळे ठाण्यातील नगरसेवक ‘बेडूक उड्या’ मारण्याच्या तयारीत

भाजप – शिवसेना युती सरकारचा मोठा निर्णय; गृहनिर्माण सोसायट्यांचा भुर्दंड झाला माफ

सुप्रिया सुळे वेबसाईटवरुन साधणार जनसंवाद

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी