31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमंत्रालयEknath Shinde : ‘एकनाथ शिंदेंची सभा होईल, पण लहान पोरांना सांभाळणार कोण?’

Eknath Shinde : ‘एकनाथ शिंदेंची सभा होईल, पण लहान पोरांना सांभाळणार कोण?’

अंगणवाडी कर्मचारी राजकीय सभेला आल्यानंतर अंगणवाडीतील लहान पोरांना कोण सांभाळणार असा अजितदादा पवार यांनी सवाल करत राजकीय सभा असेल तर कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने बोलविण्याची पद्धत महाराष्ट्रात कधीच नव्हती, असाही संताप अजितदादा यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदे यांची पैठण येथे राजकीय सभा आहे. या सभेसाठी अंगणवाडीतील सेविका, पर्यवेक्षक व मदतनीस यांना बोलाविले आहे, यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले आहे. अधिकाऱ्यांनी लेखी आदेश काढून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या सभेसाठी बोलविले आहे. वरून सांगितल्याशिवाय अधिकारी असे आदेश काढत नाहीत. अंगणवाडी कर्मचारी राजकीय सभेला आल्यानंतर अंगणवाडीतील लहान पोरांना कोण सांभाळणार असा सवाल अजितदादा पवार यांनी केला आहे. राजकीय सभा असेल तर कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने बोलविण्याची पद्धत महाराष्ट्रात कधीच नव्हती, असाही संताप अजितदादा यांनी व्यक्त केला.

महिला बालकल्याण विभागाच्या वतीने एखादा कार्यक्रम असेल किंवा परिसंवाद असेल आणि अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांना माहिती द्यायची असेल तर त्यांना असे बोलविणे संयुक्तिक ठरले असते. महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडत आहे. अंगणवाडी सेविका गेल्यानंतर लहान मुलांनी काय करायचे. मुलं कुठे जाणार. मुलांकडे लक्ष कोण देणार असा सवाल अजितदादा यांनी केला.

गर्दी जमविण्याकरीता ही परिस्थिती आताच्या मुख्यमंत्र्यांवर आलेली असेल तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. सरकारने हे फार गंभीरतेने घेतले पाहीजे. आम्ही सुद्धा सरकारमध्ये काम केलेली माणसं आहोत. अशा पद्धतीने परस्पर कुणी आदेश काढत नाहीत, अशी खंत अजितदादा यांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा…

Media Scrutiny: मी माझ्या हॉटेल रूममध्ये वर्तमानपत्र टाकण्यास मनाई केली होती : सौरव गांगुली

Eknath Shinde : ‘मंत्रीमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापर्यंत नाही’

Nitin Gadkari : घरी जेवायला बोलावणाऱ्या माजी खासदाराने नितीन गडकरींना घातली अट

‘मुख्यमंत्र्यांची राजकीय सभा, गर्दी जमविण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचा लेखी आदेश’ या शिर्षकाखाली ‘लय भारी’ने शनिवारी सर्वप्रथम बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून सरकारवर टिकास्त्र सोडले होते. त्यानंतर आज अजितदादा पवार यांनी सुद्धा सरकारवर जोरदार टीका केली.

एकनाथ शिंदे सरकार सत्तेमध्ये येवून दोन महिने उलटून गेले आहेत. तरीही या सरकारने अद्याप पालकमंत्री नेमलेले नाहीत. मंत्रीमंडळाचा दुसरा विस्तार हिवाळी अधिवेशनापर्यंत होणार नाही. आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे दुसऱ्या विस्तारात संधी मिळाली नाही, तर आमदारांची नाराजी आणखी वाढेल म्हणून विस्तार केला जात नसल्याची आम्हाला माहिती मिळाली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे सरकारवर चौफेर हल्लाबोल केला. अजितदादा म्हणाले की, आज 12 सप्टेंबर आहे. सरकारने अजूनही पालकमंत्री नेमलेले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यांचा काळ उलटून गेला तरी पालकमंत्री नेमले गेलेले नाहीत. सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविली आहेत. नवीन पालकमंत्री येईपर्यंत जिल्हा नियोजन समितीचे (डीपीडीसी) कामकाज सुरू करू नये, असे या आदेशात नमूद केले आहे.

डीपीडीसीचे पैसे कसे खर्च करायचे, कोणती कामे घ्यायची हे नवीन पालकमंत्रीच ठरवतील. सप्टेंबरपर्यंत काहीच कामे झालेली नाहीत. त्यानंतर ऑक्टोबर ते मार्च फक्त सहा महिने राहतात. मार्चअखेरपर्यंत निधी खर्च झाला नाही तर हा निधी वाया (लॅप्स) जातो.

हिवाळी अधिवेशनापर्यंत मंत्रीमंडळाचा विस्तार होणार नाही असेही कानावर येत आहे. कारण आमदारांची नाराजी वाढेल. पालकमंत्री पद मिळावे म्हणून एकेका जिल्ह्यात दोन – तीन जण इच्छूक आहेत. शेवटी पालकमंत्री कुणाला करायचे असा यक्षप्रश्न सरकारसमोर आहे की काय, असा सवाल अजित पवार यांनी केला.

या सगळ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले पाहीजे. काल अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाला. ढगफुटी झाली. अनेक ठिकाणी धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले गेले. हे पाणी वाहून चाललेले आहे. पण त्याकडे लक्ष द्यायचे कुणी. ही जबाबदारी कुणावर तरी सोपवायला पाहीजे, अशी चिंता अजित पवार यांनी व्यक्त केली.

मध्यंतरी २० मंत्र्यांना झेंडावंदन करण्याची संधी दिली. पण 16 जिल्ह्यांत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी झेंडावंदन केले. हे लोकशाहीमध्ये मान्य होणारी गोष्ट नाही. कारण लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनीच झेंडावंदन करायला हवे. सरकारच्या या कारभाराचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो.

लम्पी आजाराचे राज्यावर मोठे संकट कोसळले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी यावर तातडीने धोरण ठरवायला हवे. जनावरांच्या या आजारामुळे शेतकरी संकटात सापडणार आहे. जनावरांवर उपचार करण्यासाठी लशींचे नियोजन करायला हवे. या आजारामुळे जनावरांच्या दुधउत्पादनावर परिणाम होईल. त्यामुळे दुधाचे दर सुद्धा वाढतील, अशी भिती अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी