29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रNitin Gadkari : घरी जेवायला बोलावणाऱ्या माजी खासदाराने नितीन गडकरींना घातली अट

Nitin Gadkari : घरी जेवायला बोलावणाऱ्या माजी खासदाराने नितीन गडकरींना घातली अट

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जेवणाचे निमंत्रण दिले आहे, त्यावेळी त्यांनी निमंत्रणासोबत एक अट सुद्धा जोडली आहे. या अटीत असे म्हटले आहे की गडकरी यांनी स्वतःच्या खाजगी वाहनाने कोपरगाव ते नगर हा प्रवास करून राहुरी येथे आपल्या निवास्थानी यावे असे तनपुरे यांनी म्हटले आहे.

राजकारण्यांचे आपापसातील संबंध कधी कडू, कधी गोड तर कधी सामंजस्याचे पाहायला मिळतात त्यामुळे बऱ्याचदा हीच परिस्थिती सर्वसामान्यांना बुचकळ्यात टाकत असते. राजकारण एकीकडे जोर धरत असले तरीही आपल्या मतदार संघातील अडचणींची जाण असणारे, त्यासाठी धडपड करणारे काही नेते सुद्धा अशावेळी लगेचच चर्चेचा विषय ठरतात. अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रसाद तनपुरे यांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. तनपुरे यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जेवणाचे निमंत्रण दिले आहे, परंतु त्याआधी त्यांची एक अट असल्याचे गडकरींना त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रसाद तनपुरे यांच्या या अजब प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाल्या आहेत.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जेवणाचे निमंत्रण दिले आहे, त्यावेळी त्यांनी निमंत्रणासोबत एक अट सुद्धा जोडली आहे. या अटीत असे म्हटले आहे की गडकरी यांनी स्वतःच्या खाजगी वाहनाने कोपरगाव ते नगर हा प्रवास करून राहुरी येथे आपल्या निवास्थानी यावे असे तनपुरे यांनी म्हटले आहे. या अटीच्या माध्यमातून नगर-मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रसाद तनपुरे प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा…

Potraj : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही ‘पोतराज’ मुंबईच्या रस्त्यांवर मागून खातो

Viral Audio Clip : किमान तीनशे रुपये तरी द्या, मंत्री भूमरेंच्या सभेआधीच ऑडिओ क्लीप जोरात

Asia Cup 2022 : आशिया चषकात पुन्हा श्रीलंकेची बाजी, पाकिस्तानची पुरती जिरली

दरम्यान प्रसाद तनपुरे यांनी माध्यमांशी नुकताच संवाद साधला. यावेळी त्यांनी नितीन गडकरींना आपल्याकडे जेवणाचे निमंत्रण देत असल्याते म्हटले आहे. नगर जिल्हातून जात असताना नगर-मनमाड या महामार्गाने जावे लागले, परंतु या रस्त्याचे काम सुरू झाले असून ते काम तसेच अर्धवट बंद पडले आहे. काम अर्धवट झाल्याने येथील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे, त्यामुळे रस्ते अपघात वाढले आहेत आणि लोकांचे सुद्धा नाहक बळी जात आहेत. या महामार्गादरम्यान राहुरीपासून कोपरगावपर्यंतचा रस्ता खूपच खराब आहे, वाहने चालवणे मोठ्या जिकीरीचे बनले आहे असे म्हणत तनपुरे यांनी अगदी अनोख्या पद्धातीने नितीन गडकरींचे लक्ष वेधून घेतले आहे.

या महामार्गाच्या दुर्देशेबाबत सांगताना प्रसाद तनपुरे म्हणाले, मागील कंत्राटदाराने हे काम परवडत नसल्याने अर्धवट सोडून निघून गेला. त्या कंत्राटदाराने अंदाजपत्रकापेक्षा 27 टक्के कमी दराने हे काम घेतले होते. त्यावर जीएसटीसह अन्य कर धरले तर 49 टक्के पर्यंत कमी दराने ते काम घेतले गेले होते. असे असेल तर एवढ्या कमी पैशात हा कंत्राटदार हे काम कसे करणार होता? याची चौकशी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी का केली नाही? वास्तविक पहाता पंधरा टक्के दराने जरी कमी किमतीच्या निविदा आल्या, तरीही त्याचा फेरविचार केला जातो. मग या कामात हा नियम का लावला गेला नाही? असा थेट सवालच तनपुरेंनी केला आहे.

पुढे तनपुरे म्हणतात, मार्च 2013 मध्ये केंद्र सरकारने हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला. त्यानंतर 3 जानेवारी 2017 च्या राजपत्रात सिन्नर सावळीविहीरफाटा, शिर्डी, राहुरी, अहमदनगर, दौंड, फलटण, मिरज ते चकोडी कर्नाटक असा राष्ट्रीय महामार्ग घोषित केला गेला. पूर्वी राज्य सरकारने जेव्हा रुंदीकरण केले होते, त्यावेळी वाहनांचे वजन 20 टन धरले होते. मधल्या काळात वाहतूक वाढत गेली, नव्या बदलात वजनही शंभर टनापर्यंत मंजूर झाल्याने मोठे कंटेनर या महामार्गावरून जाऊ लागले असे म्हणत प्रसाद तनपुरे यांनी या महामार्गाचा लेखाजोखा मांडला.

दिवसभरात जवळपास 34 हजार वाहने या मार्गाने जातात. शिर्डी, शिंगणापूर ही जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र याच रस्त्यावर असल्याने सुट्टीच्या व धार्मिक उत्सवाच्या काळात या रस्त्यावर वाहतूक दुप्पट होते. अवजड वाहनामुळे रस्ते मोठ्या प्रमाणावर खचल्याने मोठी खड्डे पडले आहेत. त्यातच मागील ठेकेदाराने काही ठिकाणी एका बाजूने काम सुरू केल्याने एकेरी वाहतूक बर्‍याच ठिकाणी सुरू आहे. त्यातूनच रस्त्याची प्रचंड दुरवस्था होऊन खड्ड्यांनी पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक अवजड वाहने, दुचाकी चार चाकी वाहनांची टायर फुटणे नादुरुस्त होणे होऊन वाहतुकीस मोठा अडथळा येत असल्याचे तनपुरे यांनी उदाहरणादाखल सांगितले आहे.

या संपुर्ण पार्श्वभूमीवर वेळेत काम व्हावे यासाठी प्रसाद तनपुरे यांनी पुढाकार घेतला असून थेट नितीन गडकरींना यांत सहभागी करून घेत हा प्रश्न निकाली काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी