मंत्रालय

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा; ६ महिन्यात १३३ वेळा बदल्या

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कैलास पगारे यांची महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. सचिन्द्र प्रताप यांची बदली आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे येथे बदली करण्यात आली आहे. अजित बी. पवार यांची दुग्ध विकास विभागात आयुक्त म्हणून बदली झाली. एस. जी. कोलते यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. सुधाकर तेलंग यांची शिधावाटप नियंत्रक व संचालक नागरी पुरवठा, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात सहा महिन्यात ११३ वेळा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

‘नवी विटी, नवा डाव’ याप्रमाणे कोणतेही सरकार बदलले तर ते आपल्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांना मोक्याच्या जागी घेते. तर इतरांना साईडच्या पोस्ट दिल्या जातात. जुलै २०२२ मध्ये राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले. या सरकारने आधीच्या सरकारचा बदल्यांचा सिलसिला कायम ठेवला आहे.

२ मे २०२३ रोजी १९ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. २ जून २०२३ रोजी राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ७ जून २०२३ रोजी १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्या महाविकास आघाडीच्या काळात झाल्या होत्या. त्यानंतर आलेल्या शिंदे सरकारनेही आधीच्या सरकारची री ओढत २१ जुलै २०२३ रोजी राज्यातील ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. ५ ऑगस्ट २०२३ रोजी सरकारने १८ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. २३ ऑगस्ट रोजी पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

या पूर्वी झालेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोनिया सेठी, IAS (1994) यांची प्रधान सचिव (R&R), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रुपिंदर सिंग, IAS (1996) यांची निवासी आयुक्त आणि प्रधान सचिव, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोरक्ष गाडीलकर, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, वर्धा यांची संचालक, रेशीम, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रकाश बी.खपले, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, नांदेड यांची महाडीस्कॉम, औरंगाबाद येथे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अविनाश पाठक, IAS (2013) अतिरिक्त विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुलाब आर.खरात, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, जळगाव यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वास प्रकल्प, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रवीणकुमार देवरे, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, पुणे यांची संचालक, OBC बहुजन कल्याण, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिलिंदकुमार डब्लू.साळवे, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, गडचिरोली यांची सहआयुक्त, राज्य कर, औरंगाबाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सतीशकुमार डी. खडके, IAS (2014) मुख्य भूमापन अधिकारी, सिडको, नवी मुंबई यांची महानगर आयुक्त, नाशिक मेट्रो क्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजय एस. काटकर, IAS (2014) उपायुक्त (महसूल), नाशिक विभाग, नाशिक यांची सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पराग एस. सोमण, IAS (2014) उपायुक्त (महसूल), औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अनिलकुमार के. पवार, IAS (2014) महानगरपालिका आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, विरार यांना IAS मध्ये पदोन्नती देण्यात आली आहे आणि त्यांना महानगरपालिका आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, विरार या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा 

शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी मंत्र्यांना ‘गर्दी’ जमवण्याचे लक्ष्य
लोकशाहीची चिरफाड करणारे ‘गिधाडांची मेजवानी’
दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार?

सचिन बी. कालत्रे, IAS (2014) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांना IAS मध्ये पदोन्नती देण्यात आली आहे आणि त्यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज व्ही. रानडे, IAS (2014) उपायुक्त (सामान्य प्रशासन), कोकण विभाग, मुंबई यांची संचालक, महापालिका प्रशासन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेहा भोसले (2020) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, किनवट, नांदेड यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, जव्हार, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

2 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

4 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

5 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

6 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

6 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

7 hours ago