31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी मंत्र्यांना 'गर्दी' जमवण्याचे लक्ष्य

शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी मंत्र्यांना ‘गर्दी’ जमवण्याचे लक्ष्य

दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा, अशी म्हण आहे. त्याचबरोबर दसरा म्हणजे मेळावा, असे महाराष्ट्रातील राजकीय समीकरण आहे. राज्यात दसऱ्याचे चार मेळावे खूप चर्चेत असतात. पहिला शिवसेनेचा शिवाजी पार्कवरील, दुसरा नागपूरच्या रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, तिसरा नागपूरमधील दीक्षाभूमीवरील आंबेडकरी जनतेचा धर्मांतर सोहळ्याचा मेळावा आणि चौथा पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा. गेल्या वर्षीपासून पाचव्या दसरा मेळाव्याची भर पडली आहे. हा मेळावा आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानात झाला होता आणि यंदा मुंबईतील आझाद मैदानात होत आहे. या निमित्ताने आझाद मैदान परिसरात शिवसेनेचे झेंडे फडकू लागले आहेत.

गेल्या वर्षीपासून पाच दसरा मेळावे होत असले तरी खरी चर्चा आहे ती उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याची. यंदाही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता यावा यासाठी उद्धव ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेकडे अर्ज केले होते. पण शिंदेंच्या शिवसेनेने अर्ज मागे घेतला आणि दक्षिण मुंबई दसरा मेळावा घेणार असल्याचे जाहीर केली. त्याप्रमाणे त्यांनी आझाद मैदानाची निवड केली. आता या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

Shinde's Shiv Sena preparing for Dussehra Rally at Azad Maidan

आझाद मैदानावर मेळावा घेणार म्हटल्यावर लगेचच वादाला सुरुवात झाली. महाराष्ट्र रामलीला मंडळ आणि साहित्य कला मंडळाकडून ४८ वर्षांपासून रावणदहनाचा कार्यक्रम केला जातो. हा कार्यक्रम यंदा नवमीलाच म्हणजे आदल्या दिवशी घ्या, असा आदेश सरकारने दिला आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे गटाला जशास तसे उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने जोरदार रणनीती आखली आहे. राज्यातील शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी आणि जिल्हाप्रमुखांकडे गर्दीच्या नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. म्हणजे प्रत्येक मंत्र्याकडे किमान पाच हजार लोक आणण्याची जबाबदारी असल्याचे कळते. ही जबाबदारी म्हणजे या लोकांना आणणे, नेणे आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे. मंत्र्यांनी तशी तयारी केल्याचेही कळते.

हे ही वाचा

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार?

‘कंत्राटी’वरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये ट्विटर वॉर!

ड्रगमाफिया ललितच्या पोटात अनेक गुपिते; कोठडीत शुक्रवारपर्यंत वाढ

सध्या आझाद मैदानावर एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. येणाऱ्या शिंदेसमर्थक शिवसैनिकांची व्यवस्था करण्यावर भर दिला जातोय. आझाद मैदान हे आंदोलनाचे मैदान म्हणून ओळखले जाते. इथे अनेक वर्षांनंतर जाहीर सभा तीही दसरा मेळावा म्हणून होत असल्याने सर्वांनाच एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी