29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeसंपादकीयलोकशाहीची चिरफाड करणारे 'गिधाडांची मेजवानी'

लोकशाहीची चिरफाड करणारे ‘गिधाडांची मेजवानी’

आपल्या देशात लोकशाही आहे आणि त्याचा आपल्याला गर्व आहे. पण आपल्या या लोकशाहीत सारे काही आलबेल आहे का? लोकप्रतिनिधी, नोकरशाही त्यांची कामे इमानेइतबारे करतात का? सर्व कामे नियमानुसार केली जातात का? या लोकशाहीला काळा डाग लावण्याचे काम कुणी केले आहे? इथे दलालांची यंत्रणा कशी कामे करते? लोकशाहीत काळे कारनामे कसे जन्म घेतात? हे सर्व समजून, जाणून घ्यायचे असेल तर ‘गिधाडांची मेजवानी’ हे पुस्तक आवर्जून वाचा. जोसी जोसेफ यांच्या मूळ इंग्रजी A Feast of Vultures या पुस्तकाचे डॉ. नितीन हांडे यांनी अत्यंत सुंदर केलेला अनुवाद वाचकांना खिळवून ठेवणारा आहे.

इंग्रजीत शोधपत्रकारिता करणारे जोसी जोसेफ यांनी भारतीय लोकशाहीतील काळ्या कारनाम्यांचा लेखाजोगा मांडला आहे. त्यातून दिसणारे भयावह आणि स्फोटक चित्र मराठीत आणताना ते सौम्य होणार नाही किंबहुना त्याची इंग्रजी इतकीच दाहकता राहील याची काळजी डॉ. नितीन हांडे यांनी घेतल्याने ते प्रेक्षकांना अधिक भावते. लोकांच्या रितसर कामांसाठी मध्यस्थ, प्रत्येक ठिकाणी दलालांची यंत्रणा हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण म्हणता येईल का, असा प्रश्न पुस्तक वाचताना सर्वांना पडतो. विशेष म्हणजे आपण हे सर्व पाहतो, अनुभवतो तरीही काही करत नाही. म्हणूनच ‘गिधाडांची मेजवानी’ हे पुस्तक सर्वांना आपल्या जीवनाशी निगडीत असल्याची पानोपानी जाणीव होते. म्हणूनच पुस्तक वाचताना वाचक अस्वस्थ होतात, विचार करायला लागतात. यातच या पुस्तकाचे यश सामावले आहे.

मराठीत अनेक अनुवादित पुस्तके येत असतात. ही पुस्तके खूप दर्जेदार असतात. खूप अनुभवांतून मूळ पुस्तक आकार घेत असल्याने तो अनुभव मराठीत आल्यानंतर वाचकांचीही प्रगल्भता वाढते, असा अनुभव आहे. ‘गिधाडांची मेजवानी’ या पुस्तकातूनही प्रेक्षकांना असाच अनुभव येईल, हे निश्चित आहे. आता तर इंग्रजीसोबत इतर प्रादेशिक भाषांमधील पुस्तकेही मराठी वाचकांचे अनुभवविश्व अधिक समृद्ध करताना दिसतात. प्रादेशिक भाषांमधील पुस्तके अनुवादित करण्याचे मोठे आव्हान असते. मात्र, दोन्ही भाषांवरील जबरदस्त पकड असल्याने ते सहज शक्य होते. इंग्रजी भाषेचेही तसेच आहे. त्यामुळेच डॉ. नितीन हांडे यांनी अनुवादित केलेल्या ‘गिधाडांची मेजवानी’ या पुस्तकासाठी त्यासाठीही आवर्जून कौतुक करावे लागेल.

हे ही वाचा

‘कंत्राटी’वरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये ट्विटर वॉर!

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार?

ड्रगमाफिया ललितच्या पोटात अनेक गुपिते; कोठडीत शुक्रवारपर्यंत वाढ

मनोविकासने प्रकाशित केलेले हे पुस्तक आता 25 टक्के सवलतीत उपलब्ध आहे. पोस्टाने हवा असल्यास त्याचा खर्च वेगळा असेल. अधिक माहितीसाठी संपर्क : मनोज हिरवे (मोबाईल 95947 38110)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी