28 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरराजकीयदसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार?

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार?

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे उद्या काय बोलणार, याकडे सर्वांचेच खास करून भाजप नेत्यांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांचा उद्या (२४ ऑक्टोबर) दसरा मेळावा आहे. दरवर्षी त्या बीडमधील भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा घेतात. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने त्यांचे समर्थक येतात. यावेळी ते कोणत्या मुद्द्यावरून समर्थकांना मार्गदर्शन करणार, कोणते राजकीय भाष्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पंकजा मुंडे या जरी पक्षाच्या राष्ट्रीय सचिव असल्या तरी त्यांच्यावर राज्यातील कुठलीही जबाबदारी नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याची नेहमीच चर्चा होते. म्हणूनचदसरा मेळाव्यात त्या काय बोलणार, याकडे सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधकांचेही लक्ष लागले आहे.

यापूर्वी मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे आता आमदारही नाहीत. त्यांना विधानपरिषदेवर घेणार अशी चर्चा होती आणि ती चर्चाच राहिली. राज्याची कुठलीच जबाबदारी पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर सोपवली नसल्याने अधूनमधून कधीतरी नाराजीचा सूर निघतो, पण त्यावर त्यांनी थेट वक्तव्य कधीही केलेले नाही. म्हणूनच या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्याला बीडमधील भगवान भक्तीगडावर येताना समर्थकांना त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. आणि त्याचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या X हँडलवर अपलोड केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने आणि उत्साहाने तुम्ही येणार आहात तरीही नियम पाळून या, असे आवाहन केले आहे.

पंकजांनी दसरा मेळाव्याला येणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणत्या सूचना केल्यात, पाहुया

  • येताना खाण्याचे पदार्थ, पाणी, साखर, मीठ आवर्जून आणा
  • वाहतुकीला अडथळे होणार नाही, अशा पद्धतीने गाडी उभी करा
  • वाहने वेगात चालवू नका आणि नियम तोडू नका
  • उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून डोक्यावर टोपी, उपरणे असू द्या
  • सकाळी ११ वाजता स्थानाप्पन होता येईल, अशा पद्धतीने प्रवासाचे नियोजन करा

या सूचना करतानाच मला तुमची काळजी वाटते, असे कार्यकर्त्यांना सांगायला पंकजा मुंडे विसरल्या नाहीत.

हे ही वाचा

ड्रगमाफिया ललितच्या पोटात अनेक गुपिते; कोठडीत शुक्रवारपर्यंत वाढ

‘या’ उद्योगपतीचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू

दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या नातवाचे निधन

पंकजांची शिवशक्ती परिक्रमा आणि काव्य

पंकजा मुंडे यांनी ४ ते ११ सप्टेंबर या कालावधीत राज्यात शिवशक्ती-परिक्रमा केली होती. अनेक तीर्थस्थांनांचे त्यांनी दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांचे सर्वत्र उत्साहात स्वागत व्हायचे. यावरून एका कार्यकर्त्याने शिवशक्ती परिक्रमेवर काव्य केले आहे. ते काव्य आज पंकजा मुंडे यांनी वाचून दाखवले. शिवाय याच काव्यावरील एक व्हिडीओदेखील त्यांनी त्यांच्या X हँडवलवर शेअर केला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी