31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालय'महाविकास आघाडी' सरकारची 'कामगिरी, मंत्रालयात प्रदर्शन !

‘महाविकास आघाडी’ सरकारची ‘कामगिरी, मंत्रालयात प्रदर्शन !

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या दोन वर्षात शासनाने केलेल्या कामगिरीवर आधारित चित्रमय प्रदर्शनास भेट दिली. जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात सदर प्रदर्शन उभारलेले आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर  यांची ही प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमास जनसंपर्क विभागाचे संचालक गणेश रामदासी, संचालक दयानंद कांबळे यांची उपस्थिती होते.

याप्रसंगी जनसंपर्क महासंचालनालयाचे धनंजय मुंडे यांनी कौतुक केले आहे. हे प्रदर्शन माहितीपूर्ण आणि उपयुक्त असून किल्ल्याच्या भिंतींच्या पार्श्वभूमीवरील मांडणी देखील अतिशय आकर्षक असल्याची प्रतिक्रिया यावेळी मुंडे यांनी दिली आहे.

सदर चित्रमय प्रदर्शनातून सरकारने या दोन वर्षात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती अतिशय आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे. चिरेबंदी किल्ल्याच्या उंच भिंतीची उत्तुंगता आणि त्या पार्श्वभूमीवरील प्रदर्शन पॅनल यांचा एकत्रित अनुभव घेता यावा यादृष्टीने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण फिरता ३६० डिग्री सेल्फी पॉईंट आकर्षून घेत असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी