30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयचार राज्यातील मतदारांनी भाजपला दिलेला कौल आश्चर्यकारक ; हेमंत पाटील यांचे प्रतिपादन

चार राज्यातील मतदारांनी भाजपला दिलेला कौल आश्चर्यकारक ; हेमंत पाटील यांचे प्रतिपादन

टीम लय भारी

मुंबई : देशात महागाई, बेरोजगारी सारख्या समस्येसह काही चुकीचे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या भाजपला पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल आश्चर्यकारक आहे. या राज्यातील मतदारांनी भाजपला पुर्णत: स्वीकारले असल्याचे त्यावरून अधोरेखित होत आहे, असे प्रतिपादन ‘भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले. भाजपला लोक कंटाळली आहेत, असा साधारण मतप्रवाह निवडणुकीपूर्वी होता. खासगीकरणासह धोरणात्मक चुका करून देखील लोकांनी भाजपला स्वीकारले. आता विरोधकांनी ही बाब गांभीर्याने घेत आत्मचिंतन करण्याची वेळ आली असल्याचे पाटील म्हणाले.

उत्तर प्रदेशात दशकांची प्रथा मोडीत काढत मतदारांनी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपला सलग दुसऱ्यांदा निवडून आणले आहे. राज्याला गुंडगिरी मुक्त, भयमुक्त तसेच सुरक्षायुक्त केल्याने मतदारांनी भाजपला एकहाती सत्ता दिली. या राज्यांमधील विजयामुळे भाजपला इतर राज्यात सत्ता प्राप्त करण्यासाठी बळ मिळणार आहे. दक्षिणेकडील राज्यात विशेषत: आंधप्रदेश, तेलंगणात भाजप संघटन वेगाने फोफावत सत्तेच्या दिशेने मार्गक्रम करीत आहे, असे पाटील म्हणाले. राष्ट्रीय पक्ष कॉंग्रेसची मात्र अत्यंत दयनीय स्थिती झाली असून पक्षश्रेष्ठींनी नेतृत्व बदल करण्याच्या अनुषंगाने वेगाने सूत्रे हलवली नाही,तर भाजपच्या ‘कॉंग्रेेसमुक्त भारत’ या संकल्पनेला आणखी बळ मिळेल. लोकशाहीत विरोधक टिकणे आणि टिकवणे फार महत्वाचे असून कॉंग्रेससह इतर पक्षांनी विरोधकांच्या एकजुटीवर लक्षकेंद्रित करणे आवश्यक आहे.

एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डने डोकं वर काढले होते. याचप्रकारची गुन्हेगारी यूपीत सुरू होती.योगी आदित्यनाथ यांनी वेळीच ते हेरून गुन्हेगारी संपवण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील ‘एन्काउंटर’प्रमाणे यूपीतही ‘एन्काउंटर’ करण्यात आले. सर्वसामान्यांना याच सुरक्षित वातावरणाचा दाखला देत सत्तेपर्यंतचा मार्ग भाजपने प्रशस्त केल्याचे बोलले जात आहे. पंरतु, भाजपने आता जातपातीचे राजकारण विसरुन सत्ताकारण केले पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

आता विकासाचेच राजकारण…

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील विकास कामांच्या आधारे पंजाबमधील नागरिकांना ‘चांगल्या दिवसांचे स्वप्न’ दाखवत सत्ता मिळवली. शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा तसेच गोरगरीबांसह श्रीमंतांच्या मुलांसाठी समान शिक्षण व्यवस्थेच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून मतदारांनी आपच्या बाजूला कौल दिला. केजरीवाल यांच्याप्रमाणेच भगवंत मान यांनी राज्यकारभार चालवला तर आपचा इतर राज्यातील प्रवेश सुकर होईल. पंजाब नंतर आता केजरीवाल यांनी हरियाणात सत्तेवर येण्याचा निर्धार केला असल्याचे पाटील म्हणाले. पाच राज्यातील मतदारांनी निवडणुकीतून विकास, गुंडागर्दीमुक्त वातारवणाच्या बाजूने कौल दिला असल्याचे ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी