मंत्रालय

मुख्य सचिव सिताराम कुंटे निवृत्त होणार, नवी जबाबदारी कोणाला मिळणार ?

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे या महिनाअखेरीस निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर कोणाला संधी मिळणार याविषयी मंत्रालयात चर्चा सुरू झाली आहे (Ministry: Chief Secretary Sitaram Kunte will retire).

सिताराम कुंटे १९८५ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या नंतरच्या म्हणजे, १९८६ च्या बॅचमधील वरिष्ठ तीनपैकी एका अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती होईल. या तीन अधिकाऱ्यांपैकी कोणाची मुख्य सचिव पदासाठी निवड करायची हे मुख्यमंत्री ठरवतात.

‘मंत्रालयात बदल्या, जमिनींच्या व्यवहारात करोडोंची उलाढाल’

मंत्रालय समुद्रात डुबणार !

देवाशिष चक्रवर्ती, मनुकुमार श्रीवास्तव व जयश्री मुखर्जी हे तीन अधिकारी सेवा ज्येष्ठतेच्या यादीत आहेत. देवाशिष चक्रवर्ती हे फेब्रुवारी २०२२ मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांसाठी त्यांना मुख्य सचिव पद दिले जाण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे.

जयश्री मुखर्जी सप्टेंबर २०२२ मध्ये निवृत्त होणार आहेत, तर मनुकुमार श्रीवास्तव एप्रिल २०२३ मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यामुळे मुखर्जी व श्रीवास्तव या दोघांपैकी एकाची मुख्य सचिवपदासाठी नियुक्ती होऊ शकते.

पीडब्लयूडीच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयालाही लावली ठिगळे

Maharashtra crosses 1,000 Covid cases after 6 days, health minister Rajesh Tope clarifies no govt policy against unvaccinated

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांचा मोठा प्रभाव आहे. मेहता यांचे ऐकूनच मुख्यमंत्री बरेचसे निर्णय घेत असतात. त्यामुळे अजोय मेहता कल कोणाकडे या नुसार उद्धव ठाकरे नवीन मुख्य सचिवाची निवड करतील, असेही बोलले जात आहे.

कीर्ती घाग

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

11 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

11 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

12 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

12 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

13 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

15 hours ago