31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालयपीडब्लयूडीच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयालाही लावली ठिगळे

पीडब्लयूडीच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयालाही लावली ठिगळे

टीम लय भारी

मुंबई : पीडब्ल्यूडीचे अधिकारी सरकारी इमारतींना चुना लावण्याचे काम पद्धतशीरपणे करत आहेत. कंत्राटदार व पीडब्ल्यूडीचे अधिकारी एकत्र येऊन सरकारी तिजोरीवर डल्ला मारत आहेत. मलिदा हडपण्यासाठी टपलेल्या अधिकाऱ्यांमुळे कामांची गुणवत्ता मात्र खालावत आहे (PWD officials are working to whitewash government buildings).

गेल्या सात – आठ महिन्यांत सह्याद्री अतिथी गृहाच्या छताचा काही भाग दोनदा कोसळला. डागडुजीसाठी करोडो रुपये खर्च करून सुद्धा छताचे काम कोसळल्याने पीडब्ल्यूडीची अब्रु वेशीला टांगली गेली.

बदल्यांच्या घोडेबाजाराला मुख्यमंत्र्यांनी लावला चाप, फाईल पाठविली परत

पीडब्ल्यूडी – महानगरपालिकेची टोलवाटोलवी, बच्चू कडूंची संघटना खवळली

PWD officials are working to whitewash government buildings
कार्यालयातील भाग कोसळला

पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयातही अशीच कामे केल्याचे समोर आले आहे. मंत्रालयातील व्हरांडे, पायऱ्यांवर पीडब्ल्यूडीने यथेच्छ खर्च केला आहे. महागड्या लाद्या बसविल्या आहेत. पण यातील बरीच कामे उखडली गेली आहेत. त्यामुळे पीडल्यूडीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. उघडे पडलेले आपले अपयश झाकण्यासाठी पीडब्ल्यूडीने आता ठिगळे लावली आहेत. पायऱ्यांवरून चालताना ठिगळे लावलेली ही कामे ठिकठिकाणी दिसत आहेत (These patched works can be seen everywhere while walking on the steps).

मंत्रालयातील अधिकाऱ्यांना हवीत ‘मलईदार’ पदे, वशिल्यासाठी पुढाऱ्यांच्या शिफारसपत्रांचा खच

“Lockdown Again If Covid Cases Spike”: Uddhav Thackeray Cautions Maharashtra

PWD officials are working to whitewash government buildings
मंत्रालयातील तुटलेल्या पायऱ्या
PWD officials are working to whitewash government buildings
मंत्रालयातील पायऱ्यांना ठिगळ

‘महाविकास आघाडी’ सरकार जेमतेम दीड वर्षापूर्वी सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर मंत्रालयातील हे काम करण्यात आले होते. त्याच वेळी ‘कोरोना’चेही आगमन झाले. त्यामुळे मंत्रालयातील सामान्य लोकांची वर्दळ कमी झाली. लोकांची वर्दळ नसतानाही जिन्यातील पायऱ्या तुटल्या कशा याविषयी मंत्रालयात चर्चा सुरू आहे. मंत्रालयातच जर पीडब्ल्यूडीची बोगस कामे केली जात असतील, तर इतरत्र कामांची किती दयनीय स्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी