34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालयमंत्रालय समुद्रात डुबणार !

मंत्रालय समुद्रात डुबणार !

टीम लय भारी

मुंबई : ग्लोबल वार्मिंगमुळे समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे येत्या 2050 पर्यंत नरिमन पॉइंट आणि मंत्रालयातील 80 टक्के भाग पाण्याखाली जाईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी ही भीती व्यक्त केली आहे (Mantralaya will be submerged in the sea).

‘मुंबई क्लायमेट अँक्शन प्लॅन’ या वेबसाइटचे त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले होते. यावेळी 2050 पर्यंत मंत्रालय आणि नरिमन पॉईंट येथील 80 टक्के भाग पाण्यात जाईल. तसेच महापालिकेचे अ, ब, क, आणि ड वॉर्डपैकी 70 टक्के परिसरसुद्धा पाण्याखाली जातील असे चहल म्हणाले. प्रामुख्याने हे भाग दक्षिण विभागात मोडतात.

मंत्रालयात आणखी 25 अधिकाऱ्यांना पदोन्नती, शंभरजण पदोन्नतीच्या वाटेवर

मंत्रालयातील ‘या’ IAS अधिकाऱ्याने ‘कोरोना’च्या लढाईत उपसले प्रचंड कष्ट, आता झाली बदली

(Mantralaya will be submerge in the sea
मंत्रालय समुद्रात बुडणार अशी भीती इक्बाल चहल यांनी व्यक्त केली

मुंबईतील कफ परेड, चर्चगेटमधील मंत्रालय आणि नरिमन पॉईंट या क्षेत्रांचा 80 टक्के भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच उमरखाडी, मोहम्मद अली रोड, मरीन लाइन्स, गिरगाव आणि ब्रीच कँडी या सर्व बेटांतील शहरे देखील 2050 पर्यंत 70 टक्के पुराला तोंड देतील असे ही चहल म्हणाले.

गेल्या फेब्रुवारीमध्ये, मॅकिन्झी इंडियाच्या एका अहवालाने म्हटले होते की, 2050 पर्यंत मुंबईत पुराच्या तीव्रतेमध्ये 25 टक्के वाढ होईल.तसेच समुद्राच्या पातळीत 0.5 मी. वाढ दिसून येईल. जे 1 किमीच्या आत राहणाऱ्या दोन ते तीन दशलक्ष लोकांना प्रभावित करेल.

बदल्यांच्या घोडेबाजाराला मुख्यमंत्र्यांनी लावला चाप, फाईल पाठविली परत

80% of Mumbai’s Nariman point, Mantralaya areas will go under water by 2050: BMC chief

चहल पुढे म्हणाले की, मुंबईत अत्यंत कमी वेळेत अतिवृष्टीसारख्या हवामानाच्या घटना घडत आहेत. या वर्षी ही जुलैच्या सरासरीच्या तुलनेत 70% पाऊस फक्त चार दिवसात झाला होता. त्याचप्रमाणे मुंबईत झालेल्या चक्रीवादळामुळे 200 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी