31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमंत्रालयPolitics in Mantralaya : मंत्र्यांच्या पीएस, ओएसडींना सहा महिन्यांपासून पगारच नाहीत

Politics in Mantralaya : मंत्र्यांच्या पीएस, ओएसडींना सहा महिन्यांपासून पगारच नाहीत

टीम लय भारी

मुंबई : ‘लाल फिती’च्या कारभाराची झळ सामान्य लोकांना पदोपदी जाणवत असते. पण मंत्र्यांचे खासगी सचिव (पीएस), विशेष कार्य अधिकारी (ओएसडी), स्वीय सहाय्यक (पीए) यांनाही सरकारी कारभाराची झळ बसली आहे ( PS, OSD, PA suffered by politics in Mantralaya ).

राज्यात एकूण 43 मंत्री आहेत. त्यांच्याकडे जवळपास 175 पीएस, ओएसडी व पीए असा खासगी अधिकारी वर्ग आहे ( Around 175 PS, OSD, PA works in Mantralaya). मंत्र्यांनी सूत्रे हाती घेऊन साधारण सहा महिने झाले आहेत. मंत्र्यांनी आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करूनही 5 ते 6 महिने उलटले आहेत.

Mahavikas Aghadi

हे सुद्धा वाचा : दीपिका पादुकोण ‘लॉकडाऊन’मध्येही कामात व्यस्त

परंतु कित्येक पीएस, ओएसडी, पीए यांच्या नियुक्त्यांना सामान्य प्रशासन विभागाने मान्यताच दिलेली नाही. काही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना उशिरा मान्यता दिली आहे, तर अनेकांना अद्यापही मान्यता दिलेली नाही.

मंत्र्यांनी पत्र दिल्यानंतरही पहिले तीन महिने काही अपवाद वगळता जवळपास कुणाच्याच नियुक्त्यांना सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली नव्हती.

हे सुद्धा वाचा :  जिल्हाधिकाऱ्यांनी सीओंना झापले; रूग्णांना निकृष्ट जेवण देता, किमान येथे तरी ‘खाऊ’ नका

त्यानंतर ‘कोविड-19’चे आगमन झाले. त्यामुळे जीएडीच्या अधिकाऱ्यांना पीएस, ओएसडी, पीएंच्या नियुक्ती टाळायला आणखी ‘निमित्त’ सापडले ( PS, OSD, PA’s appointment delayed by GAD In Mantralaya ).

मंत्र्यांकडे काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांना आपल्यावर अन्याय होतोय हे कुणाला सांगताही येईना. मंत्र्यांकडे सामान्य लोक सतत येत असतात. त्यांना न्याय देणे, त्यांच्या अडीअडीचणी सोडविणे अशी कामे पीएस, पीए व ओएसडी करीत असतात. परंतु स्वतःवरच होत असलेला अन्याय आपल्या मंत्र्याला तरी कसा सांगायचा अशी पंचाईत या अधिकाऱ्यांची झाली आहे.

Politics in Mantralaya : मंत्र्यांच्या पीएस, ओएसडींना सहा महिन्यांपासून पगारच नाहीत

हे सुद्धा वाचा : उद्धव ठाकरेंनी केली डॉक्टरांच्या मानधनात वाढ

नाडलेल्या या अधिकाऱ्यांनी मग जीएडीच्या अधिकाऱ्यांकडे तगादा लावणे, गोड बोलणे, विनंत्या करणे असा खटाटोप केला. त्यामुळे काही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे आदेश जारी झाले. तीन – चार महिने पाठपुरावा केल्यानंतरच या अधिकाऱ्यांचे आदेश जारी झाले आहेत.

परंतु अजूनही अनेक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे आदेश जारी झालेले नाहीत. काही अधिकाऱ्यांच्या फाईल सुद्धा गहाळ ( Politics In Mantralaya ) झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आदेश जारी झाले नसल्याने या अधिकाऱ्यांना पगारापासूनही वंचित राहावे लागले आहे.

हे सुद्धा वाचा : सुप्रिया सुळेंचा निरोप आला, अन् IAS शेखर चन्ने यांनी अडचणीत असलेल्या 9 जणांना घरी पोचविले

मागील सरकारच्या विचारधारेचे काही अधिकारी जीएडीमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे हे अधिकारी मुद्दाम मंत्र्यांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांना अडचणीत आणण्याचे उद्योग ( Politics in Mantralaya) करीत असतात. याच भावनेतून आमच्या नियुक्त्यांचे आदेश जारी केले जात नाहीत, अशी संतप्त भावना काही अधिकाऱ्यांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी