31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईमहाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

टीम लय भारी

मुंबई :- महाडचे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले. मुंबईत रविवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून माणिकराव जगपात हे आजारी होते.  महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान आणि उमदे नेतृत्व गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत (Former MLA of Mahada Manikrao Jagtap passed away).

माणिकराव जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी याआधी आमदारकी भूषवली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची धुराही त्यांच्या खांद्यावर होती. आज दुपारी 2 वाजता महाड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान आणि उमदे नेतृत्व गमावल्याच्या भावना महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन व्यक्त करण्यात आल्या आहेत (Maharashtra Congress official Twitter handle).

महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना महाप्रलयाचा तडका, प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचे प्रदर्शन करावे

केंद्रीय मंत्री नारायण राणे झाले ट्रोल; या कारणामुळे नेटकऱ्यांनी घेतले फैलावर

माणिकराव जगताप यांच्या निधनावर अनेक नेत्यांनी शोककळा व्यक्त केली आहे. मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माझे निकटचे सहकारी माणिकराव जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात काँग्रेस पक्षाचे कोकणातील एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे.

माजी आमदार माणिकराव जगताप हे उत्तम संघटक होते, लोकप्रश्नांवर हिरिरीने काम करणारे नेते होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसची मोठी हानी झाली असून, मी एक बंधुतुल्य मित्र गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, ही प्रार्थना असे त्यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त परळीत बॅनरबाजी, भाजपच्या नेत्यांचे फोटो मात्र गायब

Congress sees strife in Chhattisgarh, MLA accuses minister of conspiracy

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शोक व्यक्त केला आहे. अजित पवार म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, रायगड जिल्हा अध्यक्ष, महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार, आमचे मित्र, सहकारी माणिकराव जगताप यांचे आकस्मिक निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्यांच्या निधनाने जनमाणसाचं प्रेम लाभलेला, रायगड जिल्ह्याचा, कोकणचा कर्तृत्ववान सुपुत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यासोबतच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. माणिकराव यांच्या कन्या स्‍नेहल, सुपुत्र श्रीयश आणि संपूर्ण जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही प्रार्थना असे त्यांनी सांगितले आहे.

MLA of Mahada Manikrao Jagtap passed away
माणिकराव जगपात

कोण आहेत माणिकराव जगपात?

2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचा पराभव राष्ट्रवादीचे माणिकराव जगताप यांनी केला. महाडच्या राजकीय इतिहासात हा पराभव महत्त्वाचा मानला गेला. 2004 मध्ये प्रभाकर मोरे यांचा पराभव माणिकराव जगताप यांनी अवघ्या साडेतीन हजार 779 मतांनी केला. तर 2009 मध्ये भरत गोगावले यांनी तब्बल 14,960 मतांनी प्रभाकर मोरे यांच्या पराभवाचा वचपा काढला. 2014 च्या निवडणुकीत माणिकराव जगताप राष्ट्रवादीतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने महाडमध्ये स्वतंत्र निवडणूक लढली आणि माणिकराव जगताप यांना 2014 मध्येही पराभव पत्करावा लागला. या वेळी 21,256 मतांची आघाडी भरत गोगावले यांना मिळाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी