31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रखासदार राहुल शेवाळे यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी

खासदार राहुल शेवाळे यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी

टीम लय भारी

मुंबई :-  कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना राज्यातील कोरोना लसीकरण मोहिमेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला (For CM Assistance Fund) खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई आणि खासदार विनायक राऊत उपस्थित होते. महाराष्ट्रातील मोफत कोरोना लसीकरण मोहिमेसाठी खारीचा वाटा देण्यासाठीच्या भावनेतून हे करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे.

लोकांच्या जीवापेक्षा मोदींना प्रतीमा संवर्धन महत्त्वाचे आहे का? नाना पटोले यांचा सवाल

कोरोना लसीकरणावरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

Decision to increase gap between Covishield doses ‘based on scientific data’: Health minister

देशभरात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. या निर्णयानुसार केंद्राकडून महाराष्ट्राला कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध होत आहे. परंतु काही प्रमाणात राज्य सरकारला कोरोना लस खरेदी करणे अनिवार्य आहे. केंद्र सरकारकडून कोरोना लसींचा साठा मोफत उपलब्ध होत असला तरीही राज्यातल्या जनतेचे मोफत लसीकरण वेगाने करण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे.

यासाठी यंत्रणेवर मोठा खर्च करावा लागेल. तसेच राज्य सरकारला काही प्रमाणात लस खरेदी करणे अनिवार्य आहे. आधीच गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडलेला आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी या नात्याने खारीचा वाटा उचलावा, या भावनेने माझे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’त (For CM Assistance Fund) जमा करण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी