35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईदिल्लीत 'मुंबई मॉडेल'चं कौतुक; मुंबईकरांनी कोरोनाला कसं हरवलं?

दिल्लीत ‘मुंबई मॉडेल’चं कौतुक; मुंबईकरांनी कोरोनाला कसं हरवलं?

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबईत रुग्णसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऑक्सिजनपुरवठ्याच्या बाबतीत मुंबई महापालिकेने चांगले काम केले आहे. त्यांच्याकडून बोध घेतला पाहिजे. दिल्लीत ‘मुंबई मॉडेल’चं कौतुक; मुंबईकरांनी कोरोनाला कसं हरवलं? (Appreciation of ‘Mumbai Model’ in Delhi; How did Mumbaikars defeat Corona?). असे सर्वोच्च न्यायालयाचे धनंजय चंद्रचूड म्हणाले.

आम्ही ऑक्सिजनचा बफर स्टॉक करण्यास सांगितले होते. कोट्यवधींची लोकसंख्या असलेल्या मुंबईत (Mumbai) हे शक्य आहे तर त्याचे अनुकरण निश्चितपणे दिल्लीतही करणे शक्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे धनंजय चंद्रचूड म्हणाले. मुंबई मॉडेलचे (Mumbai model) विश्लेषण करण्यात यावे आणि त्यावर मुंबईची (Mumbai) चमू सादरीकरणही देऊ शकते, असे ही ते म्हणाले आहेत. न्यायालयाने नोंदवलेल्या या निरीक्षणानंतर पुन्हा एकदा मुंबई मॉडेलची (Mumbai model) चर्चा होऊ लागली आहे. मुंबईने (Mumbai) कोरोनावर कसे नियंत्रण मिळवले याचा घेतलेला आढावा.

आरक्षणापेक्षा अंतर्गत राजकारणालाच अधिक महत्व दिले : शिवेंद्रसिंहराजे भोसले

राजकीय मतभेद बाजूला ठेवा!; मुख्यमंत्री आणि फडणवीसांना संभाजीराजेंची विनंती

‘Near breaking point’: An unending loop of oxygen shortages and tragic deaths in Delhi hospitals

रुग्णसंख्या नियंत्रणात

मुंबईत (Mumbai) झापाट्याने वर गेलेला कोरोनाचा संसर्ग गेल्या दहा दिवसांपासून पुन्हा नियंत्रणात येऊ लागला आहे. फेब्रुवारीत मुंबईत (Mumbai) कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या पाच ते सहा हजारांवर सापडत होते परंतु, गेल्या काही दिवसांपासून ही रुग्णसंख्या दहा ते ११ हजारांवर गेली आहे. बुधवारी मुंबईत तीन हजार ८८२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. रुग्ण संख्येला पुन्हा उतार येऊ लागल्याने मुंबई पूर्वपदावर येऊ लागली आहे. मुंबई शहर (Mumbai City) आणि उपनगरातील रुग्ण दुपटीचा कालावधी एप्रिल अखेरीस ३० ते ३५ दिवस इतका होता. परंतु कठोर निर्बंधांनंतर रुग्ण संख्या घटू लागल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वेगाने वाढू लागला आहे. मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी १२३ दिवस इतका आहे. तर, मुंबईचा रिकव्हरी रेट ९० टक्के इतका झाला आहे (The duration of double patient in Mumbai is 123 days. So, Mumbai’s recovery rate is 90 percent).

करोना रोखण्यासाठी ही मात्रा सर्वांत प्रभावी

कोरोनाचा संसर्ग चाळी आणि झोपडपट्ट्यांपेक्षा इमारतींमध्ये वेगाने फैलावतो आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाविषयक उपाययोजनांमध्ये नव्याने जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये इमारतींवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. नवीन निर्बंधांमध्ये एखाद्या सोसायटीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास ती इमारत ‘मिनी कण्टेन्मेंट’ झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे. तसा फलक सोसायटीच्या प्रवेशद्वारावर लावला जात असून बाहेरच्या नागरिकांना इमारतीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सोसायटीतील नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडता येत आहे. कोरोना रोखण्यासाठी ही मात्रा सर्वांत प्रभावी असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

पोलिसांची नजर

मुंबईच्या (Mumbai) कोरोना लढ्याला साथ मिळाली ती मुंबई पोलिसांची. प्रत्येक प्रतिबंधित क्षेत्राबाहेर पोलिस, बिटमार्शलना नजर ठेवणे बंधनकारक केले आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्यास पोलिसांचा पहारा ठेवला जातो. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू दिले नाही. पोलिस मित्र म्हणून नेमलेल्या नागरिकांचा वापर उपयुक्त ठरला आहे (The use of citizens appointed as police friends has proved useful).

नागरिकांचा प्रतिसाद

पाच रुग्ण आढळले की संपूर्ण इमारत सील केली जाते. एखाद्या मजल्यावर एक रुग्ण सापडला तरी आजूबाजूच्या घरांतील सर्वांच्या चाचण्या केल्या जात आहेत. मजला सॅनिटायझ केला जातो. परिणामी संसर्ग वाढत नाही. घरात विलगीकरण केलेल्या रुग्णांसाठी वैद्यकीय पथकांची प्रत्यक्ष भेट किंवा दूरध्वनीवरून संवाद. असंख्य सोसायट्यांनी पालिकेला चांगले सहकार्य केले आहे. सोसायटी पदाधिकारी स्वतःहून नवीन रुग्णांची माहिती पालिकेला देत आहेत. बाहेरच्या लोकांना सोसायटीत येऊ देण्यास प्रतिबंध केला जात आहे.

निर्बंधांची अमलबजावणी

कोरोना रुग्णसंख्या वाढत गेल्यानंतर वेळीच पालिकेने कठोर पावले उचलत कठोर उपाययोजना लागू केल्या. तसेच मुंबईत रेल्वे, बस, टॅक्सी आणि रिक्षांमध्ये प्रवासी संख्येवर निर्बंध घालण्यात आले आहेत. संपूर्ण मुंबईत नागरिकांच्या वावरावर निर्बंध कठोर केले (Restrictions on the movement of citizens across Mumbai were tightened). नागरिकांचा एकमेकांशी संपर्क कमी करण्यात यश आल्याने संसर्गात मोठी वाढ झालेली नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी