32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रराजकीय मतभेद बाजूला ठेवा!; मुख्यमंत्री आणि फडणवीसांना संभाजीराजेंची विनंती

राजकीय मतभेद बाजूला ठेवा!; मुख्यमंत्री आणि फडणवीसांना संभाजीराजेंची विनंती

टीम लय भारी

मुंबई :-  सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी एक महत्त्वाचे पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे (Sambhaji Raje has written an important letter to Chief Minister Uddhav Thackeray and Leader of Opposition Devendra Fadnavis). सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मराठा समाजासाठी दुर्दैवी असल्याचेही संभाजीराजेंनी नमूद केले आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाने पारीत केलेला व मुंबई उच्च न्यायालयाने कायम केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने काल रद्द केला. मराठा समाजासाठी हा निकाल अत्यंत दुर्दैवी आहे. आपण सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतोच, परंतु मराठा समाजाला आरक्षण पाहिजेच, अशी समाजाची भावना आहे. ते कसे मिळवून द्यायचे? याबाबत राजकीय नेतृत्वाने मतभेद बाजूला ठेऊन एकत्रितपणे मार्ग काढणे गरजेचे आहे. ती सर्वस्वी जबाबदारी आपणा सर्वांची आहे.

आरक्षणापेक्षा अंतर्गत राजकारणालाच अधिक महत्व दिले : शिवेंद्रसिंहराजे भोसले

“कोणी उद्रेक शब्दही काढू नका”, संभाजीराजेंची मराठा समाजाला विनंती

राजकारण बाजूला ठेऊन या पेच प्रसंगातून मार्ग करण्यासाठी नेहमी सहकार्य करण्याची भूमिका मी कायम घेतली होती आणि यापुढेही घेत राहीन. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मागील सरकारला देखील माझे सहकार्य होते आणि विद्यमान सरकारला सुद्धा नेहमी सकारात्मक सहकार्य करत आलो आहे. माझ्यासाठी हा विषय राजकारणा पलिकडचा आहे. कारण वंचित मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी मी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे, असे सांगत संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना साद घातली आहे.

SC strikes down Maratha reservation in admissions, government jobs, calls it unconstitutional

कालच्या निकालाने मात्र मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. आरक्षणावर एखादा कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत आपण सुपर न्युमररी सारखा पर्याय अंमलात आणला पाहिजे, जो राज्याच्या अधिकार क्षेत्रात येतो. यापूर्वी देखील मी याबाबत अनेकदा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा केलेला आहे. सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा समाज सशक्त करणाऱ्या संस्था सक्षम करणे अत्यंत गरजेचे आहे, असे संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी पत्रात म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालत मराठा समाजाने या राष्ट्रासाठी आजपर्यंत सर्वोच्च त्याग केला आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी ज्या मराठा समाजाला बहुजन समाजासोबत आरक्षण देऊन सर्व बहुजनांना एका छताखाली आणले होते, अशा मराठा समाजावर अन्याय करून चालणार नाही. मागील राहिलेल्या उणीवा दुरुस्त करून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण कसे देता येईल? यावर विचार विनिमय करून त्वरीत मार्ग काढण्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य व केंद्र शासनाची आहे, याव्यतिरिक्त आम्हाला काही माहित नाही, असे छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी नमूद केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी