33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबई21 day lockdown : शरद पवार, सुप्रिया सुळेंनी मांडला बुद्धीबळाचा डाव

21 day lockdown : शरद पवार, सुप्रिया सुळेंनी मांडला बुद्धीबळाचा डाव

21 day lockdown : मिळालेल्या वेळेचा कुटुंबासाठी सदुपयोग

टीम लय भारी

मुंबई : लॉकडाऊनमुळे ( 21 day lockdown ) सगळ्यांनाच घरात बसावे लागले आहे. वेळ कसा घालवायचा म्हणून सामान्य लोकांना चिंता लागली आहे. पण शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी अनोख्या पद्धतीने वेळेचा सदुपयोग केला आहे. त्यांनी चक्क बुद्धीबळाचा पट मांडून मस्त टाईमपास केला. त्यांचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

21 day lockdown
शरद पवारांनी सोंगट्या चातुर्याने हलविल्यानंतर सुप्रिया सुळेंनीही त्यांना दाद दिली

शरद पवार व सुप्रिया सुळे दोघेही बुद्धीबळ खेळण्यात चांगलेच रमले आहेत. पटावरच्या सोंगट्या क्लृप्तीने योग्य ठिकाणी लावत ‘याला हरवलं पाहीजे… याला वाचवलं पाहीजे…’ असे काहीतरी पवार बोलत आहेत. पवारांच्या या चातुर्यावर सुप्रिया सुळे दाद देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोबत सुळे यांची कन्या रेवती सुद्धा आहे. आजोबा व आईमध्ये रंगलेला बुद्धिबळाचा खेळ ती पाहात आहे.

पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावर हा बुद्धिबळाचा खेळ मंगळवारी रंगला होता. शरद पवार व सुप्रिया सुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात सतत व्यस्त असतात. त्यांच्या भोवती नेहमी कार्यकर्त्यांचा गराडा असतो. पण ‘कोरोना’मुळे सरकारने ‘लॉकडाऊन’ जाहीर केले, अन् सगळे जनजीवन ठप्प झाले. पवार व सुळे यांनीही ‘लॉकडाऊन’चे ( 21 day lockdown ) कटाक्षाने पालन केले आहे. त्यामुळे ते घराच्या बाहेर कुठेही जात नाहीत. कार्यकर्तेही त्यांच्या घरी येऊ शकत नाहीत. या वेळेचा सदुपयोग ‘बाप, लेक व नाती’ने वेगळ्या पद्धतीने केला. बुद्धिबळाचा डाव मांडला, व कौटुंबिक मोकळेपणाचा आनंद घेतला.

‘लॉकडाऊन’मुळे ( 21 day lockdown ) घरात बसावे लागले तरी आपल्या कुटुंबाला वेळ द्यायची संधी मिळाली आहे. विस्मृतीत गेलेले बैठे खेळ खेळण्यासाठी आता वेळ मिळाला आहे. कुटुंबियांसोबत रमण्यासाठी मिळालेल्या या निवांत क्षणांचा चांगला वापर करायला हवा, असाच संदेश या व्हिडीओतून मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या ट्विटर अकाऊंटला फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Coronavirus चा अमेरिकेत उद्रेक : पंधरा दिवसांत 900 वरून 53 हजार रूग्णांची वाढ

CurfewInIndia : आरोग्यमंत्र्यांनी जनतेला लिहिले विनंतीपत्र

Coronavirus : राज्यातील 17 ‘कोरोना’ग्रस्त रूग्ण झाले बरे

‘कोरोना’ची जगभरातील LIVE आकडेवारी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी