33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईखारघरवासीयांनो रविवारी जरा जपूनच घराबाहेर पडा

खारघरवासीयांनो रविवारी जरा जपूनच घराबाहेर पडा

शहरातील वाहतून व्यवस्थेत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. आपण सुटीच्या दिवशी कुटुंबासह घराबाहेर पडायल आणि आपल्याला मनस्ताप होऊ नये, असे वाटत असेल तर ही बातमी पूर्ण वाचा. ही माहिती तुमच्या फायद्याची आहे. तुमचं रविवार खराब होणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारी एका कार्यक्रमासाठी नवी मुंबईत येत आहेत. त्यामुळे खारघर, ओवे, तळोजा, कोपरा या सर्वच ठिकाणी वाहतूक नियंत्रित करण्यात येत आहे.  

खारघरवासीयांनो रविवारी जरा जपूनच घराबाहेर पडा, कारण शहरातील वाहतून व्यवस्थेत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. आपण सुटीच्या दिवशी कुटुंबासह घराबाहेर पडायल आणि आपल्याला मनस्ताप होऊ नये, असे वाटत असेल तर ही बातमी पूर्ण वाचा. ही माहिती तुमच्या फायद्याची आहे. तुमचा रविवार खराब होणार नाही, तुम्हाला पर्यायी मार्ग माहीत राहतील आणि तुमची गैरसोयही या “लय भारी”च्या माहितीमुळे टळू शकेल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारी एका कार्यक्रमासाठी नवी मुंबईत येत आहेत. खारघरमध्ये हा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे खारघर, ओवे, तळोजा, कोपरा या सर्वच ठिकाणी वाहतूक नियंत्रित करण्यात येत आहे. नवी मुंबई पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी  यासंदर्भातील माहिती कळविली आहे.

 

शनिवार, रविवारचे खारघरमधील वाहतुकीत बदल

नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी कार्यक्रमानिमित्त शनिवार, 15 एप्रिल 2023 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून रविवार, 16  एप्रिलच्या रात्री 11 वाजेपर्यंत खारघरमधील ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिजखालून बी. डी. सोमणी स्कूल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौकपर्यंतचा रस्ता संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. फक्त कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायांना घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता खुला राहणार आहे, असे वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे.

अ) प्रवेश बंद 

दिनांक 15/04/2023 रोजी 14.00 वाजल्यापासून ते दिनांक 16/04/2023 च्या रात्रौ 23.00 वाजेपर्यंत ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रीजखालून बी. डी. सोमानी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौकपर्यंतच्या रस्त्यावर नमूद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे.

हे सुद्धा वाचा :

खुशखबर : हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही !

मुंब्रा बायपास बंद; काटई, खोणी, तळोजा, कल्याण-डोंबिवलीत वाहतूककोंडी

‘अमित शाह खूनी है’, विधानसभेत घोषणाबाजी !

ब) पर्यायी मार्ग 

1. ग्रामविकास भवन ने ग्रीन हेरीटेज चौक ते मुर्ती चौक, विनायक सेठ चौक मार्गे पापडीचा पाडा, तळोजा मार्गे इच्छित स्थळी जातील.
2. आरएएफ तळोजाकडून पापडीचा पाडा मार्गे, विनायक सेठ चौक, मुर्वी गांव चौक मार्गे इन्च्छीत स्थळी जातील.
3. ओवेगावातील रहिवाशी ओवेगाव चौक ते पापडीचा पाडा मार्गे तळोजा किंवा खारघर येथून इच्छित स्थळी जातील.
4. ही अधिसूचना कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना येवुन येणारी वाहने / बस या करिता लागू असणार नाही.
5. अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना ही बंदी लागू असणार नाही.

Kharghar Traffic, Amit Shah, Navi Mumbai, Amit Shah Navi Mumbai Programme, Kharghar Traffic Diversion

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी