31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeमुंबईLaybhari : राज ठाकरेंची भेट घेतली आणि २४ तासात समस्या सुटली

Laybhari : राज ठाकरेंची भेट घेतली आणि २४ तासात समस्या सुटली

टीम लय भारी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोळी भगिनींनी सोमवारी भेट घेतली होती. त्यानंतर २४ तासांच्या आत त्या बेकायदा मासेविक्री करणा-या मुजोरांना दणका दिल्याचा दावा (Laybhari) मनसेकडून करण्यात आला आहे. (Laybhari : they met Raj Thackeray and the problem was resolved within 24 hours)

स्थानिक मनसे विभागाध्यक्ष संजय नाईक यांनी २४ तासात त्या बेकायदा मासेविक्री करणा-या मुजोरांना दणका दिला व कोळी भगिनींची समस्या सोडवली अशी माहिती मनसे अधिकृत या टि्वटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.

या महिला थेट कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आल्या होत्या. त्यांनी बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा अशी मागणी केली होती. राज ठाकरेंनी त्यांच्याशी काही वेळ संवाद साधला आणि प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.

दरम्यान, फक्त कोळी भगिनीच नव्हे, तर लॉकडाउनच्या काळात जीम चालक-मालक, सलून व्यावसायिक, मुंबईतील डब्बेवाले यांनी देखील राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी