28 C
Mumbai
Friday, December 8, 2023
घरमुंबईजावेद अख्तर यांनी मनसे दीपोत्सव कार्यक्रमात दिल्या 'जय सिया राम' च्या घोषणा

जावेद अख्तर यांनी मनसे दीपोत्सव कार्यक्रमात दिल्या ‘जय सिया राम’ च्या घोषणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) मुंबईतील शिवाजी पार्क येथे गुरुवारी (9 नोव्हेंबर) आयोजित केलेल्या दीपोत्सव (MNS Dipotsav Festival 2023) कार्यक्रमात सुप्रसिद्ध पटकथाकार जोडी जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि सलीम खान (Salim Khan) म्हणजेच सलीम-जावेद यांनी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती लावली होती. यावेळी जावेद अख्तर यांनी उपस्थितांसामोर ‘जय सिया राम’ ची घोषणा दिली. ‘माझा जन्म श्रीराम आणि सीता यांच्या देशात झाला आहे. मी राम आणि सीता यांना फक्त हिंदूंचा वारसा समजत नाही; या देशातील प्रत्येक व्यक्तीची ती संपत्ती आहे. राम आणि सीता हे या देशातील सर्व नागरिकांचे दैवत आहेत. रामायण ही आपली सांस्कृतिक मालमत्ता आहे’, असे त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा दीपोत्सव कार्यक्रमाचे (Diwali 2023) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबतच सुप्रसिद्ध पटकथाकार सलीम खान, पटकथाकार आणि गीतकार जावेद अख्तर, अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, मनसे नेते अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यासह इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी, उपस्थितांशी संवाद साधत जावेद अख्तर म्हणाले, “मी लखनऊचा राहणारा आहे. लहानपणी मी पाहायचो जे श्रीमंत लोक होते. ते गुड मॉर्निंग म्हणायचे. पण रस्त्यावरून जाणारा सामान्य माणूस जय सियाराम म्हणायचा. त्यामुळे सीता आणि राम यांचा वेगळा विचार करणं हे पाप आहे. सियाराम हा शब्द प्रेम आणि एकतेचं प्रतिक आहे. सिया आणि राम यांना फक्त एकानेच वेगळं केलं होतं. त्याचं नाव होतं रावण. त्यामुळे जो वेगळं करेल तो रावण असेल. म्हणून तुम्ही माझ्यासोबत तीन वेळा जयसियारामचा नारा द्या. आजपासून जय सियारामच म्हणा.”

हे ही वाचा 

धनत्रयोदशीला सोने का विकत घेतात? वाचा सविस्तर

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस

प्रदूषणमुक्त वातावरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या मौलिक सूचना, काय म्हणाले मुख्यमंत्री

मनसेच्या कार्यक्रमात जावेद अख्तर उपस्थिती लावणार असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “गोष्टी स्पष्टपणे बोलल्या पाहिजे. उघड बोलले पाहिजे. तेव्हाच मजा येते. या मंचावर आम्हाला पाहून काही लोकांना आश्चर्य वाटले असेल. राज ठाकरेंना सलीम-जावेदच्या शिवाय दुसरे कोणी मिळाले नाही का? असेही अनेकांना वाटेल. स्वत:ला नास्तिक समजणारे जावेद अख्तर या मंचावर कसे? असा प्रश्नही अनेकांना पडला असेल, पण राज ठाकरे हे आमचे परममित्र असून राज ठाकरेंनी शत्रूला जरी आमंत्रण दिले तर शत्रूदेखील नाकारणार नाही… आम्ही तर मित्रच आहोत.” यावेळी सलीम-जावेद जोडीने अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी