33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रLockdown 5.0 : शरद पवारांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरेंकडून ‘लॉकडाऊन’ शिथील होण्याची शक्यता

Lockdown 5.0 : शरद पवारांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरेंकडून ‘लॉकडाऊन’ शिथील होण्याची शक्यता

टीम लय भारी

मुंबई : ‘लॉकडाऊन’ शिथील करून काही व्यवहार सुरू व्हायला हवेत. राज्याचे आर्थिक चक्र चालू राहायला हवे, असा शरद पवार ( Sharad Pawar insists to relax Lockdown 5.0 )  यांचा आग्रह आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाचवा लॉकडाऊन शिथील करू शकतात, असे बोलले जात आहे.

ठाकरे यांनी चौथ्या टप्प्यातील ‘लॉकडाऊन’ जाहीर केला तेव्हा शरद पवार यांनी वेगळी मते व्यक्त केली होती. ‘लॉकडाऊन’ किती कडक असावा यावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद आहेत, असेही समोर आले होते. पण पाचव्या ‘लॉकडाऊन’बाबत दोघांचेही एकमत झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे ( Sharad Pawar and Uddhav Thackeray concurred on Lockdown 5.0 )

हे सुद्ध वाचा : Sharad Pawar meets Uddhav Thackeray : शरद पवार मातोश्रीवर, राजकीय वर्तुळात खळबळ

हे सुद्धा वाचा : सत्ता गेल्यामुळेच भाजपच्या नेत्यांनी ताळतंत्र सोडलेय, शरद पवार यांची इच्छा असेल तरच सरकार पडेल : अनिल गोटे

लॉकडाऊन आणखी कडक हवा – उद्धव ठाकरे

मुंबई – पुण्यासह राज्यात ‘कोरोना’चे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ अधिक कडक असायला हवा अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती.

परंतु ‘कोरोना’ इतक्यात संपुष्टात येणार नाही. ‘कोरोना’सह आयुष्य जगण्याची वेळ आली आहे. शाळा, महाविद्यालये, शेतकरी, छोटे मोठे उद्योजक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन शिथील करायला हवा अशी भूमिका शरद पवार यांनी ( Sharad Pawar aggressive to relax Lockdown 5.0 )  मांडलेली आहे.

हे सुद्धा वाचा : दशक्रिया विधीचा खर्च टाळून ‘लॉकडाऊन’मध्ये भरडलेल्या गोरगरीबांना केली मदत

‘लॉकडाऊन’च्या अनुषंगाने शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चाही केली होती ( Sharad Pawar discussed on Lockdown 5.0 with Uddhav Thackeray ). त्यानंतर वर्षा निवासस्थानी ‘महाविकास आघाडी’च्या नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीतही ‘लॉकडाऊन’बाबत चर्चा झाली आहे.

Lockdown 5.0 : शरद पवारांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरेंकडून ‘लॉकडाऊन’ शिथील होण्याची शक्यता

शरद पवारांनी आग्रही भूमिका घेतली असल्याने पाचवा लॉकडाऊन वाढविला तरी तो बऱ्याच प्रमाणात शिथील केला जाईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. राज्याचा महसूल वाढेल, सामान्य लोकांचे आर्थिक चक्र काही प्रमाणात सुरू होईल अशा पद्धतीने पाचव्या लॉकडाऊनमध्ये ( There is chances to relaxation in Lockdown 5.0 ) निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही या सूत्रांनी सांगितले.

सामान्य लोकांच्या मनातही लॉकडाऊन कधी संपणार, लॉकडाऊन कधी उठवला जाणार, लॉकडाऊन किती दिवस वाढणार, लॉकडाऊन शिथील होणार का ? अशा विचारांचे काहूर माजले आहे. त्यामुळेच पाचव्या लॉकडाऊनच्या निर्णयाकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी