36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeराजकीयPolitics : सत्ता गेल्यामुळेच भाजपच्या नेत्यांनी ताळतंत्र सोडलेय, शरद पवार यांची इच्छा...

Politics : सत्ता गेल्यामुळेच भाजपच्या नेत्यांनी ताळतंत्र सोडलेय, शरद पवार यांची इच्छा असेल तरच सरकार पडेल : अनिल गोटे

टीम लय भारी

धुळे : सत्ता गेल्यामुळेच भाजपच्या (BJP) नेत्यांनी ताळतंत्र सोडलेय, शिवसेना, (Shivsena) राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार हे शरद पवारांनी (Sharad Pawar) स्थापन केलेले सरकार असून ते त्यांच्या इच्छेनेच पडेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी पत्रकाव्दारे केला आहे.

विधानसभेत मोठा पक्ष ठरूनही बहुमत सिद्ध न करू शकल्याने भाजपला सत्तेच्या बाहेर व्हावे लागले. त्यामुळे ही सल त्यांना सतत टोचत असते. महाराष्ट्रातील सत्ता भाजपच्या हातून हिसकावून घेतल्यामुळे भाजपचे नेते ताळतंत्र सोडून वाटेल तसे बरळत सुटले आहेत. अकारण बरळण्याची आणि वाचाळपणाची भाजप नेत्यांची सवय जुनीच असल्याची टीका गोटे (Anil Gote) यांनी केली.

आकाशपाताळ एक करुन पंतप्रधानांसह सर्व नेत्यांच्या सभांचे आयोजन करुनही केवळ १०५ वर भाजपची गाडी अडकली. सध्या भाजपच्या एकाही नेत्याला कुणीही गांभीर्याने घेत नाही. कहर म्हणजे सरकार पडण्याच्या तारखा देण्याला सुरूवात केली. मात्र शरद पवारांनी स्थापन केलेले सरकार त्यांच्या इच्छेनेच पडेल. सत्तेचा गोवर्धन तसूभर हलणार नाही. भाजपचे वाचाळ महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारची एक विटही हलवू शकले नाही. उलटपक्षी अकारण रोज उठून शासनावर टीका करायची. आघाडीच्या घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविरुध्द बरळत राहणे, त्यांना टिकेचे लक्ष्य करायचे, अशा नियोजनशुन्य राजकीय बालीशपणामुळे भाजपला कुणी गांभीर्याने घेत नाही, असे गोटे (Anil Gote) यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा…

 

शरद पवारांच्या राज्यपाल भेटीमध्ये विधानपरिषदेच्या 12 जागांबाबत चर्चा

अनिल देशमुख रेल्वे मंत्र्यांवर संतापले, महाराष्ट्राची फजिती करण्याचा डाव आखल्याचा केला आरोप

‘कोरोना’ग्रस्त पोलिसाने पत्नीसोबत रूग्णालयातच केला लग्नाचा वाढदिवस साजरा, अनिल देशमुख – धनंजय मुंडेंनी केले कौतुक

देवेंद्र फडणवीसांचे आव्हान शिवसेनेने स्विकारले, आज देणार उत्तर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी