मुंबई

समाजात वादंग पेटवणाऱ्या पोस्टवर पोलिसांची करडी नजर : मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब झाली सक्रिय

टीम लय भारी :

मुंबई : हल्लीच्या युगात जसं तंत्रज्ञान पुढे गेले आहे त्यामुळे अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांच प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यातच सध्या महाराष्ट्रातील राजकारण भोंगा आणि हनुमान चालीसाभोवती फिरत असून चांगलच तापलं आहे. या गंभीर परिस्थितींची झळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सोशल मिडिया करत असते. याशिवाय हल्ली प्रत्येक सामान्य माणूस हा सोशल मिडियावर सक्रिय असून या राजकारणाचे पडसाद सामाजिक स्तरावरदेखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळे सोशल मिडियावर वादग्रस्त वक्तव्य आणि पोस्टमुळे अनेक समाज घटकांमध्ये तेढ निर्माण होण्याच्या घटना घडत असतात. याला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब सक्रिय झाली आहे. (Mumbai Police’s social media lab became active)

सध्याची परिस्थिती पाहता समाजकटंकाकड़ून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत. मुंबईत जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी सोशल मीडिया लॅब सक्रिय करण्यात आली आहे.

यामुळे आता सोशल मीडियाचा वापर करत सामाजित तेढ निर्माण करण्यांना आता चाप बसणार आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात येतेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जातीय तेढ निर्माण करु शकणाऱ्या सुमारे 3000 पोस्ट डिलीट केल्या आहेत. (Mumbai Police’s social media lab became active)


हे सुद्धा वाचा :

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्यपाल कोश्यारींची राजभवनात घेतली भेट

नाशिकच्या पोलीस आयुक्तांचा भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश

भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट, समीर वानखेडेंवर होणार गुन्हा दाखल?

Pratiksha Pawar

Recent Posts

जन आरोग्य योजना भ्रष्टाचाराने बरबटली; नाशकात दोन खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

17 mins ago

नाशिक उंटवाडी रोड येथे दूध नमुना मोफत तपासणी शिबीर

केवळ "विश्वास" या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो…

1 hour ago

मतदान केंद्रावर वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर

उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य…

2 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष सरवण्याचे काम: नाना पटोले

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) आरोप…

2 hours ago

शिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…

11 hours ago

नाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…

11 hours ago