32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्यपाल कोश्यारींची राजभवनात घेतली भेट

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्यपाल कोश्यारींची राजभवनात घेतली भेट

टीम लय भारी

मुंबई :- मुंबईचे नविन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. हेमंत नगराळे यांनी मुंबईत राजभवनामध्ये भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट होती. भेटीत दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.

मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी ‘लेटरबॉम्ब’ टाकत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

कोण आहेत हेमंत नगराळे?

हेमंत नगराळे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा १९  महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी २०१६  मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे या आधी पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत होते. मार्च २०२१ मध्ये परमबीर सिंह यांची उचलबांगडी करुन हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा चार्ज देण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारलाः हेमंत नगराळे

सर्वांना माहिती आहे, मुंबई पोलीस सध्या एका कठीण समस्येतून जात आहेत. ही समस्या पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मदतीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी नेमणूक केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारला आहे. मुंबई पोलिसांची जी प्रतिमा मलिन झाली आहे, त्याला येणाऱ्या दिवसात चांगले करण्याचा प्रयत्न करणार. आमच्या मुंबई शहरामधील अधिकारी कर्मचारी सगळ्यांचे सहकार्य, सहभाग या कार्यामध्ये लाभणार असल्याचे ही हेमंत नगराळे यांनी काल आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताना सांगितले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी